ETV Bharat / state

गारुड्यांच्या तावडीतून दोन कोब्रा नागांची सुटका, गारुडी मात्र फरार - पोलीस

मुक्या प्राण्यांसह सापांचा खेळ दाखवणे कायद्याने गुन्हा असूनदेखील काही गारुडी शहरी भागात सापांचा खेळ दाखवण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. अशीच घटना ठाणे शहरात समोर आली आहे.

गारूड्यांच्या तावडीतून दोन कोब्रा नागांची सुटका
author img

By

Published : Jul 16, 2019, 7:52 AM IST

ठाणे - गारुड्यांच्या तावडीतून 2 कोब्रा नागांची सुटका करण्यात आली आहे. गारुडी टिटवाळा येथील गणपती मंदिरासमोर खेळ दाखवत होते. जागृत नागरिकांनी ही बाब वन विभागाला कळवली. वन अधिकारी घटनास्थळी पोहोचताच गारुड्यांनी टोपलीसह नाग सोडून पळ काढला. टिटवाळा पोलीस त्या फरार गारुड्यांचा शोध घेत आहेत.

गारूड्यांच्या तावडीतून दोन कोब्रा नागांची सुटका

मुक्या प्राण्यांसह सापांचा खेळ दाखवणे कायद्याने गुन्हा असूनदेखील काही गारुडी शहरी भागात सापांचा खेळ दाखवण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. त्यातच नागपंचमीच्या सणाला 20 दिवस शिल्लक असतानाच शहरात नागांना दूध पाजण्याच्या बहाण्याने गारुड्यांनी भाविकांकडून पैसे उकळण्यात धंदा थाटला आहे.

अशीच दोन गारुडी सोमवारी टिटवाळा परिसरातील प्रसिद्ध महागणपती मंदिरासमोर भाविकांना टोपलीतील नाग दाखवत दूध पाजण्याच्या बहाण्याने भाविकांकडून पैसे उकळत होते. ही गोष्ट वार संस्थेतील स्वप्निल कांबळे आणि निखिल कांबळे या दोघांना समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन या गारुड्यांना सापांचा खेळ दाखवून पैसे देण्यास मनाई केली. तसेच त्यांनी वन अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. काही वेळातच वन अधिकारी जाधव हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वन अधिकाऱ्यांना पाहताच दोघाही गारुड्यांनी टोपलीसह नाग टाकून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर या दोन्ही नागांना वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्यांना जंगलात सोडणार असल्याचे सांगितले. तसेच गारुड्यांविरोधात वन्यप्राणी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:गारूड्यांच्या तावडीतुन दोन कोब्रा नागाची सुटका; मात्र गारुडी फरार

ठाणे :- गारुड्यांच्या तावडीतून 2 कोब्रा नागांची सुटका जागृत नागरिकांच्या सतर्कतेने झाल्याची घटना टिटवाळा येथील गणपती मंदिरासमोर घडली आहे, मात्र वन अधिकाऱ्यांना पाहताच त्या गारुड्यांनी टोपलीसह नाग सोडून पळ काढला आता टिटवाळा पोलीस त्या फरार गारूड्यांचा शोध घेत आहे,
मुक्या प्राण्यांसह सापांचा खेळ दाखवणे कायद्याने गुन्हा असून देखील काही गारुडी जंगलातून विषारी सापांना पकडून यांचा शहरी भागात खेळ दाखवत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहे, त्यातच नागपंचमी च्या सणाला वीस दिवस शिल्लक असतानाच शहरात नागांना दूध पाजण्याच्या बहाण्याने गारुड्यांनी भाविकांकडून पैसे उकळण्यात धंदा थाटला आहे, अशीच दोन गारुडी आज टिटवाळा परिसरातील प्रसिद्ध महा गणपती मंदिरासमोर भाविकांना टोपली तील नाग दाखवा नागाला दूध पाजण्याच्या बहाण्याने भाविकांकडून पैसे उकळत होते, ही गोष्ट वार संस्थेतील स्वप्निल कांबळे आणि निखिल कांबळे या दोघांना समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन या गारुड्यांना सापांचा खेळ दाखवून पैसे देण्यास मनाई केली आणि वन अधिकाऱ्याला या घटनेची माहिती दिली, काही वेळातच वन अधिकारी जाधव हे पथकासह घटनास्थळी दाखल होताच दोघाही गारुड्यांनी टोपली सह नाग टाकून घटनास्थळावरून पळ काढला त्यानंतर या दोन्ही नागांना वन अधिकारी ताब्यात घेऊन उद्या जंगलात सोडणार असल्याचे सांगण्यात आले तेरे गारोळे विरोधात वन्यप्राणी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे,
ftp foldar -- tha, titwala snek 15.7.19

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.