ETV Bharat / state

धावत्या ट्रकला भीषण आग; केमिकल पावडरसह संपूर्ण साहित्य खाक, वसई-भिवंडी मार्गावरील घटना

author img

By

Published : Oct 7, 2020, 2:16 AM IST

Updated : Oct 7, 2020, 6:56 AM IST

मिकल पावडर आणि कापडाचे तागे घेवून जात असलेल्या भरधाव ट्रकला अचानक आग लागली. वसई-भिवंडी महामार्गावरील डुंगे गावाजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली. ट्रकमधून चालक आणि क्लिनरने उड्या घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

धावत्या ट्रकला भीषण आग
धावत्या ट्रकला भीषण आग

ठाणे - केमिकल पावडर आणि कापडाचे तागे घेवून जात असलेल्या भरधाव ट्रकला अचानक आग लागली. आगीत ट्रकमधील संपूर्ण साहित्य खाक झाले. वसई-भिवंडी महामार्गावरील डुंगे गावाजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली. ट्रकमधून चालक आणि क्लिनरने उड्या घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

केमिकल पावडरसह संपूर्ण साहित्य खाक, वसई-भिवंडी मार्गावरील घटना

भिवंडीतील गोदामातून केमिकल पावडरचे ड्रम, कापडाचे ताके आणि इतर साहित्य असलेला ट्रक (एच.आर ३८ व्हाय ३१६४) गुजरातला जात होता. भरधाव ट्रक भिवंडी तालुक्यातील डुंगे गावच्या हद्दीतील एका चढणीवर असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. त्यावेळी ट्रकला भीषण आग लागली. ट्रकमधील केमिकल पावडरचे ड्रम, कापडाचे ताके व अन्य वेगवेगळ्या प्रकारचा लाखो रुपयांचा माल ट्रकसह जळून खाक झाला. या आगीत ट्रकचा केवळ सांगाडाच वाचला आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होईपर्यंत संपूर्ण साहित्य खाक झाले. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Last Updated : Oct 7, 2020, 6:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.