ETV Bharat / state

ठाण्यातील संचारबंदीला व्यापाऱ्यांचा विरोध

ठाण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. व्यापारी संघटनांनी एकत्र येत, महापालिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे. मात्र सर्वांनी नियमांचे पालन करावे, परिस्थिती हाताबाहेर गेल्यास आणखी कडक पाऊले उचलावे लागतील असा इशारा महापौरांनी दिला आहे.

ठाण्यातील संचारबंदीला व्यापाऱ्यांचा विरोध
ठाण्यातील संचारबंदीला व्यापाऱ्यांचा विरोध
author img

By

Published : Apr 6, 2021, 10:10 PM IST

ठाणे - जान है तो जहान है, अशा शब्दात आज ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर नरेश म्हस्के यांनी सर्वांना नियम आणि निर्बंध पाळण्याचे आवाहन केले. कोरोनाचे थैमान सुरूच असून, ठाण्यात दररोज नवीन रेकॉर्ड ब्रेक होतोय त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. ठाणे महापालिकेकडून अनेक खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यात आली आहेत. दरम्यान ठाण्यात अत्यावश्यक सेवा वगळता सगळी दुकाने बंद करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यावर बोलताना महापौर म्हणाले की, आपण जिवंत राहिलो तरच पुढचं सगळं शक्य आहे, त्यामुळे सर्वांनीच नियम आणि निर्बंध पाळावेत अन्यथा परिस्थिती आटोक्याबाहेर गेली तर आणखी कडक पाऊले उचलावे लागतील असा इशारा यावेळी महापौरांनी दिला.

ठाण्यातील संचारबंदीला व्यापाऱ्यांचा विरोध

लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, पुन्हा एकदा हळूहळू सर्व व्यवहार सुरू झाले होते, मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत असल्याने, राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. ठाण्यात कोरोनाबाधितांचा आकडा जास्त असल्याने, ठाणे महापालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र महापालिकेच्या या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. आज व्यापारी संघटनांनी एकत्र येत सरकारचा निषेध केला. सरकारने जीएसटीमधून सूट द्यावी, किंवा इतर काही सवलती द्याव्यात तरच व्यापारी पुन्हा एकदा उभे राहातील अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. दरम्यान सरकारने फक्त लॉकडाऊन घोषित केले, मात्र राज्यातील 13 लाख दुकानदार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबांचा विचार करण्यात आला नसल्याचा आरोप देखील यावेळी व्यापाऱ्यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.