ठाणे - दिवसेंदिवस कल्याण-डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासात कल्याण-डोंबिवलीत ४२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याची ही पहिलीच वेळ आहे.
आज (रविवार) ४२ रुग्ण आढळून आल्याने बाधितांचा आकडा ५००वर जाऊन पोहोचला आहे. तर आतापर्यंत ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे १८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या स्थितीत ३०९ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आतापर्यत कल्याण पूर्व भागात १४९ बाधित रुग्ण तर कल्याण पश्चिम परिसरात १०५, डोंबिवली पूर्व भागात १११, तर डोंबिवली पश्चिम परिसरात ९९ यासह मांडा टिटवाळामध्ये २५, अंबिवाली गावात ३ आणि मोहने येथे ८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.