ETV Bharat / state

वन्यप्राण्यांच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

शहरातील बाळकुम माजीवडा परिसरात एक तस्कर येणार असल्याची गुप्त माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्या आरोपीला अटक केली.

author img

By

Published : May 18, 2019, 12:58 PM IST

अटक केलेला आरोपी

ठाणे - वन्यप्राण्यांच्या कातडीची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. समीर जाधव, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस उपायुक्त दिपक देवराज

शहरातील बाळकुम माजीवडा परिसरात एक तस्कर येणार असल्याची गुप्त माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून वाघ, बिबट आणि मगरीचे कातडे तसेच हत्तीचे २ दात असा एकूण ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच कापुरबावडी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने वन्यप्राण्यांची कातडी कुठून आणली होती? यासंदर्भातील तपास ठाणे गुन्हे शाखा करीत आहे.

Intro:ठाण्यात 45 लाखांचा वन्यजीव कातडी जप्त खंडणी विरोधी पथकाची कारवाईBody:ठाणे क्राईम ब्राचंने एक मोठी कारवाई केलीये... एका मोठ्या वन्य जीव प्राण्यांची कातडी तस्करी करणा-या तस्कराचा ठाणे क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकाने केलीये... धक्कादायक म्हणजे या तस्कराने वाघ, बिबटा वाघ, मगर, हत्त्ती” या वन्यजिव प्राण्याचे कातडे व दात तस्करीत करता ठाण्यात आणले होते... ठाण्याच्या बाळकुम माजीवडा परिसरांत हा तस्कर येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती... त्यानुसार वन विभागाच्या अधिका-यांसोबत या तस्कराला पकडण्यासाठी खंडणी विरोधी पथकाने सापळा लावला होता... हा तस्कर येताच त्याला अटक केली... समीर जाधव असं या तस्कराचे नाव असून तो ड्रायव्हरचे काम करतो... वाघाचे कातडे, बिबटयाचे कातडे, मगरीचे कातडे व हत्तीचे दोन दात असा ४५ लाख रूपयांचा माल हस्तगत केले असुन त्याबाबत कापुरबावडी पोलिस ठाण्यात वन्यजिव संरक्षण कायदा १९७२ चे कलम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येवुन आरोपीला अटक करण्यात आलीये.या वन्यजीव प्राण्यांच्या कातडी आरोपीने कुठून आणल्या होत्या यांची शिकार कुठे करण्यात आली याचा तपास ठाणे क्राईम ब्रांच करत आहे ...

बाईट १ : दिपक देवराज (पोलीस उपायुक्त, ठाणे गुन्हे पोलिस)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.