ETV Bharat / state

Thane Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार; आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक - उल्हासनगर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून अपहरण करत तिच्यावर अत्याचार करण्यात ( Minor Girl Rape Case ) आला. याप्रकरणी आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक ( Accused Arrested Paschim Bengal ) करण्यात आली आहे.

Thane Crime News
Thane Crime News
author img

By

Published : Apr 27, 2022, 4:40 PM IST

ठाणे - लॉकडाऊन काळात शेजारी राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून अपहरण करत तिच्यावर अत्याचार करण्यात ( Minor Girl Rape Case ) आला. याप्रकरणी आता ३० वर्षीय तरुणाला २ वर्षानंतर पश्चिम बंगालमधून हिललाईन पोलिसांनी ( Hilline Police Station ) अटक केली ( Accused Arrested Paschim Bengal ) आहे. मोहम्मद शेख उर्फ अली, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मुर्शिदाबादमधून मुलगी आणि आरोपीला अटक - पीडित मुलगी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी भागात राहते. तिच्याच शेजारी मोहम्मद उर्फ अली राहतो. लॉकडाऊनच्या काळात मोहम्मदने पीडित मुलीशी ओळख निर्माण करून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर २० जून २०२० रोजी तिचे अपहरण केले. याप्रकरणी त्यावेळी पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर हिललाईन पोलीस गेल्या दोन वर्षांपासून या पीडित मुलीच्या आणि आरोपीच्या शोधात होते. अखेर पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद शहरात दोघेही असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या एका पथकाने आरोपी मोहम्मद शेख व पीडित मुलीला तिच्या बाळासह ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक माहिती देताना

पीडित मुलीने दिला बाळा जन्म - खळबळजनक बाब म्हणजे पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. त्या बाळाचे आणि आरोपीचे डीएने तपासून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवाय आरोपी मोहम्मद शेखवर सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याच्या कलमात वाढ करुन त्याच्यावर बलात्कार आणि पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला २६ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - Fuel Price Crisis : इंधन दरावरून राज्य आणि केंद्र आमने-सामने; केंद्राकडून राज्याला सापत्न वागणूक - मुख्यमंत्री ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.