ETV Bharat / state

काही लोक आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस खातात; सदाभाऊंचा शेट्टींना टोला

नव्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नाव न घेता राजू शेट्टींवर जोरदार टीका केली. तसेच त्यांना शेतकऱ्यांचे काही घेणे देणे नसून फक्त स्वार्थ साधायचा, असेही ते म्हणाले.

some people go to baramati for mla said sadabhau  khot
काही लोक आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस खातात; सदाभाऊंचा शेट्टींना टोला
author img

By

Published : Jan 11, 2021, 9:47 PM IST

ठाणे - केंद्र सरकारने लागू नव्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नाव न घेता राजू शेट्टींवर जोरदार टीका केली. काही लोक आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस आणि गोड चहा घेतात, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.

सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया

सद्याचे सरकार कुचकामी -

लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतो, असे खोट बोलून फक्त आमदारी मिळावी, यासाठीचे प्रयत्न शेतकऱ्यांना दिसून येत आहे. एकबाजूला सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला कारखाना मालकांच्या मांडीला मांडी लावून बसायचे, हे उद्योग बंद करा, असा टोलाही त्यांनी राजू शेट्टी यांना लगावला. तसेच आमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, त्याचे प्रश्न सोडवले. तसेच अनेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचे केले. परंतु सद्याचे सरकार कुचकामी असून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाहीत. तसेच त्यांना शेतकऱ्याचे काही घेणे देणे नसून फक्त स्वार्थ साधायचा, अशी टीका खोत यांनी यावेळी केली.

काहींनी शेतकऱ्यांचा डोक्यात भ्रम निर्माण केला -

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना बाजार पेठेतून स्वतंत्र मिळाले आहे. या नवीन कायद्यामुळे शेतकरी आणि बाजार पेठांना फायदा होणार असून काहींनी शेतकऱ्यांचा डोक्यात भ्रम निर्माण केल्यामुळे दिल्ली येथील शेतकरी आंदोलन सुरू असल्याचेही ते म्हणाले.

आता हमी भाव मिळणार -

या कायद्यांमुळे शेत मालाला हमी भाव मिळू शकतो. तसेच 70 वर्ष जुनाट कायदे शेतकाऱ्यांवर लादले आणि लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याचे उदाहरण डोळ्यासमोर आहे. काँग्रेस आणि काही इतर पक्ष जाणूनबुजून टीका करत आहेत.

हेही वाचा - बर्ड फ्लूसाठी ठाणे महानगरपालिकेत नियंत्रण कक्षाची स्थापना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.