ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. असे असतानाही अनेक नागरिक घराबाहेर पडतानाचे चित्र पहायला मिळत आहे. पोलीस प्रशासन त्यांचे काम जबाबदारीने पार पाडत आहे. मात्र, नागरिक त्याचे भान न ठेवता ऐकण्याच्या मनस्थितीत असेलेले दिसत नाही. यामुळे चिडलेल्या एका चिमुकलीने एका व्हिडिओमधून आपली खंत व्यक्त केली आहे.
हेही वाचा... मुंबईत होणारे 'IFSC' केंद्र गुजरातमध्ये हलवले ! केंद्राच्या निर्णयानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु
भैरवी म्हात्रे या चिमुकलीने आपल्या व्हिडिओ संदेशात तीन मुद्यांना हात घातला आहे. कर्फ्यु कसा आहे, हे पाहण्यासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांना ती बेअक्कल लोक म्हणते. तसेच तुम्ही लोक तुम्ही तुमच्या पाऊलांनी कोरोनाला तुमच्या घरात आणताय, याची जाणीव देखील करुन देते. व्हॉट्स अॅप फेसबुकवर जे महाभाग कोरोनावर विनोद बनवतात. फेक बातम्या टाकतात. त्यांनाा भैरवीने चांगलेच धुतले आहे. त्यांना ती, जर तुमच्या कुटुंब आणि नातेवाईकांपैकी कोरोनामुळे कोणी मेलं, तर खोट्या बातम्या आणि जोक बनवण्याची हिंमत आहे का ? असा सवाल करते. शेवटी आपण सगळे एकत्र मिळून कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचा मनसुबा हाणून पाडूया, असा एकजूटीचा संदेश देखील भैरवीने दिला आहे. सध्या या चिमुकलीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.