ठाणे - निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या एका कुटुंबाला शिवसेना नगरसेवकाने 51 हजार रुपयांची मदत केली आहे. महेश गायकवाड असे या नगरसेवकाचे नाव आहे.
आधीच कोरोनाच्या महामारीने त्रस्त असलेल्या नागरिकांवर बुधवारी 'निसर्ग' नावाच्या चक्रीवादळाचे नैसर्गिक संकट आले. या वादळाने कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील अनेकांचे संसार उद्धस्त केले. तर कल्याण डोंबीवली शहरातही काही प्रमाणात नुकसान केले.
चक्रिवादळाच्या तडाख्यात कल्याण-पूर्वेतील भगवान नगरमधील चाळीत राजू एरंडे यांच्या घरावर भले मोठ झाड पडले. यात घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे एरंडे कुटुंब अक्षरशः उघड्यावर येऊन पडले होते. या घटनेची माहिती मिळाल्यावर महेश गायकवाड यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पहाणी केल्यानंतर त्यांनी एरंडे कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज (गुरुवारी) त्यांनी एरंडे कुटुंबीयांना ५१ हजारांच्या मदतीचा धनादेश दिला.
तसेच घराच्या पुर्नबांधणीसाठी लागणारे साहित्यही देण्याचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी कबुल केले. तसेच शासकीय स्तरावरूनही मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महेश गायकवाड यांनी दाखविलेल्या या औदार्याप्रती एरंडे कुटुबीयांसह परिसरातील नागरीकांनीही त्यांचे आभार मानुन कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक राजाराम पावशे, शहर संघटक शरद पाटील, शाखा प्रमुख संजय पावशे, प्रशांत बोटे, महिला पदाधिकारी, शिवसैनिक आदी. उपस्थित होते.
#Cyclone 'निसर्ग' : उघड्यावर आलेल्या कुटुंबाला नगरसेवकाची ५१ हजारांची मदत
चक्रिवादळाच्या तडाख्यात कल्याण-पूर्वेतील भगवान नगरमधील चाळीत राजू एरंडे यांच्या घरावर भले मोठ झाड पडले. यात घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे एरंडे कुटुंब अक्षरशः उघड्यावर येऊन पडले होते.