ETV Bharat / state

Thane Municipal Corporation : मालमत्ता करापोटी ५९१ कोटी इतकी विक्रमी वसुली; ऑनलाईन भरणा करण्याला ठाणेकरांचे प्राधान्य - मालमत्ता कर

ठाणे महापालिकेने मागील संपूर्ण वर्षभरात जी वसुली केली होती ती वसुली यंदा दोन महिने आधीच जानेवारी अखेरपर्यत पुर्ण केली आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणेकरांना मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले होते. आवाहनाला प्रतिसाद देवून नागरिकांनी ऑनलाईन भरणा करीत ५९१ कोटी रुपये जमा केले आहेत.

Thane Municipal Corporation
मालमत्ता करापोटी ५९१ कोटी इतकी विक्रमी वसुली
author img

By

Published : Feb 5, 2023, 7:36 PM IST

ठाणे : ठाणे महापालिकेने मागील संपूर्ण वर्षभरात जी वसुली केली होती ती वसुली यंदा दोन महिने आधीच जानेवारी अखेरपर्यत पुर्ण केली आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणेकरांना मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद देवून नागरिकांनी कर भरणा केल्याने आयुक्तांनी ठाणेकर करदात्यांचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, तब्बल ९० टक्के नागरीकांनी ऑनलाईन तसेच धनादेशाद्वारे कर भरणा केल्याने ठाणेकर डिजीटल व्यवहारांना पसंती देत असल्याचे दिसुन येत आहे.

सुटीच्या दिवशी भरला कर : ठाणे महापालिकेचे महत्वाचे उत्पन्नाचे स्त्रोत म्हणजे मालमत्ता कर या मालमत्ता कराचा भरणा वेळेवर व्हावा यासाठी प्रशासनाने वेळोवेळी बैठका घेवून तसेच अन्य उपाययोजना केल्या होत्या. नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी महापालिकेची सर्व प्रभाग कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. तसेच ऑनलाईन प्रणाली सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली होती.

मालमत्ता कर वसुल : त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणेकरांनी मालमत्ता कराचा भरणा केल्याने मागील वर्षीच्या तुलनेत जानेवारी अखेरीस महापालिकेने ११० कोटीचा अधिकचा मालमत्ता कर वसुल केल्याची माहिती आयुक्तांनी दिली. यावर्षी दि. ३१ जाने. पर्यंत ५९१ कोटी मालमत्ता कर वसुल झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ३१ मार्च पर्यंतची वसुली ही ५९१ कोटी होती, ती या वर्षी जानेवारी महिन्यातच पूर्ण केली आहे, त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये ११० कोटींनी अधिकचा मालमत्ता कर वसुल झाला आहे.

९० टक्के वसुली धनादेश,डी.डी,ऑनलाईनद्वारे : सुलभरित्या कर भरता यावा ठाणे महापालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसेच Google pay, phonePe, Paytm, व Bhim App द्वारे ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरणेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिला असून घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने तसेच धनादेश, डी.डी. च्या माध्यमातून ९० टक्के कर भरणा केला आहे.

हेही वाचा - Kasba By Election : कसबा पोटनिवडणुकीत 'वंचित'ची उडी; महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.