ठाणे - मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव शुक्रवारी विरारमध्ये एका युट्यूब चॅनेलवर बोलताना "आमची सत्ता आली तर आम्ही घरातून उचलू" हे वक्तव्य ठाण्यातील बड्या नेत्यांच्या चांगलंच जिव्हारी लागलंय, सेना आमदार प्रताप सरनाईक यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून थेट अविनाश जाधव यांना आव्हान केले आहे, की "घरात येऊन उचलून घेऊन जाऊ, म्हणजे आम्ही काय चिल्लर आहोत का? एकनाथ शिंदे लांबचीच गोष्ट आमच्या साध्या एका कार्यकर्त्याला उचलून दाखव, असे आमदार सरनाईक म्हणाले, त्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यांची अटक झाली होती. त्यानंतर सेना-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर वाद सुरू झाला होता.
ठाण्यातील राजकीय वातावरण तापले, सेना मनसे वाद चव्हाट्यावर ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सोशल मीडियावर सेना मनसेमध्ये जोरदार वॉर सुरू झाले होते, अटक करून त्यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली, ज्या दिवशी जामीन मंजूर झाला आणि तळोजा कारागृहाच्या बाहेर मनसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आणि तिथून शिवसेना आणि मनसे या वादाला जोरदार सुरुवात झाली. सोशल मीडियानंतर मनसेकडून ठाण्यात आक्रमक पोस्टरबाजी सुरू झाली आणि ठाण्यातील राजकारण तापणार हे चित्र दिसून येत होते. मनसे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव शुक्रवारी वसई विरार दौऱ्यावर असताना एका युट्यूब चॅनेलवर दिलेल्या प्रतिक्रियेवर आज ठाण्यातील नेत्यानी चांगलाच समाचार घेतला. आमदार प्रताप सरनाईक यांनी जाधव यांच्यावर सडकून टीका केली म्हणाले की, कधी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या मांडीवर बसतो, आय.एस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे योग्य नाही लोकशाहीने आपल्याला स्वातंत्र्य दिले म्हणून त्याचा गैरवापर करायचा का?, काल जे वाक्य केलं की, 'आमची सत्ता आली तर घरातून उचलू, असे जाधव म्हणाले यावर बोलताना सरनाईक यांनी थेट आव्हान करत, एकनाथ शिंदे सोडा आमच्या एका साध्या कार्यकर्त्यांला उचलून दाखव आणि यापुढे शिवसेना नेत्यांवर,अपशब्द धमकीची भाषा करत असेल तर गाठ थेट माझ्याशी आम्ही सोडणार नाही', असे आमदार प्रताप सरनाईक प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाले. या वक्तव्यावर खासदार राजन विचारे यांनी देखील एका प्रसिद्ध केला व व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना स्टाईलने उत्तर दिले, अविनाश जाधव नावाचे गृहस्थ डावखरे, नाईक, शिंदे संपले असे म्हणाले. ते कोणाच्या बोलण्याने संपत नाहीत. ते आपल्या कर्तृत्ववाने मोठे झाले. सोशल मीडियावर व्हिडीओ, बाईट टाकून कोणी मोठे होत नाही, असा टोला जाधवांना मारला. तसेच, चॅलेंज आम्हाला देऊ नका आमच्यातल्या शिवसैनिक जागा आहे. घरातून उचलू म्हणजे आम्ही काय लहान मूल आहोत का, असा सवाल खासदार राजन विचारे यांनी केला.
मनसे पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हणाले की, मी बाळासाहेबांच्या प्रत्येक शिवसैनिकांचा आदर करतो. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. जे मला त्रास देत आहेत, खोटे गुन्हे दाखल करत आहेत, आमची सत्ता येईल तेव्हा आम्हीही तसेच उत्तर देऊ. मग तुम्ही मला त्रास का देताय, असा प्रश्न जाधव यांनी विचारला. अनेक जेष्ठ शिवसैनिक राजसाहेबांचा आदर करतात. त्यामुळे मला शिवसैनिकांचा नितांत आदर आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा सर्व उत्तर देऊ, असे अविनाश जाधव म्हणाले.
यामुळे ठाणे जिल्ह्यातील मनसे शिवसेना राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया वॉर सुरू होते. परंतु, आता दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे भविष्यात ठाण्यातील राजकारण रंगणार, हे मात्र नक्की. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.