ठाणे - ३१ डिसेंबर आले की ठाण्यातील येऊर भागाकडे सर्वांची पावले वळतात. परंतु, सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे आणि प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गर्दी टाळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सदर तारखेच्या चार दिवस आधीपासूनच येऊरच्या गेटवर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. तसेच, येऊरच्या जंगलात नागरिक पार्टी करतात, त्यामुळे जंगलावरही पोलिसांची नजर आहे. जंगलात गस्त घातली जात आहे.
हेही वाचा - मीरा भाईंदरमध्ये युवक काँग्रेसकडून युवा संवाद कार्यक्रम
जंगलाच्या आतमध्ये एकांतात पार्टी करणे तरुणींसाठी धोकादायक आहे. यामध्ये तरुणीचा विनयभंग होणे, किंवा तिच्याबरोबर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, जंगली प्राण्यांपासूनही तरुण मंडळींना जिवाचा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणूनच आता पोलीस जंगलातही गस्त घालत आहे.
आतापर्यंत 450 मद्यपींवर कारवाई
ठाण्यात 25 डिसेंबरपासून वाहतूक पोलिसांची दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी ४५० मद्यपींवर कारवाई केलेली आहे. हा आंकडा येत्या काही दिवसात वाढणार आहे. येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून अनेक ठिकाणी मद्यपी आपले दारू पिण्याचे अड्डे बनवत असतात. अशा सगळ्या अड्ड्यांवर वर्तक नगर पोलिसांची करडी नजर असणार आहे. नवीन वर्षाच्या सुरवाती पर्यंत या भागात वर्तक नगर पोलीस गस्त घालणार आहे. त्यासाठी वेगवेगळी पथके बनवन्यात येणार आहेत. आजपासून ही पथके कार्यरत असणार आहेत.
हेही वाचा - कोरोना रुग्ण संख्येत कल्याण डोंबिवली जिल्ह्यात अव्वल