ठाणे : भारताचे पंतप्रधान यांच्या मातोश्रीचे आज गुजरात मधील गांधीनगरमध्ये दुःखद निधन झाल्याने त्यांना कल्याणमधील श्री वाणी विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले यश महाजन यांनी रंग खडू माध्यमातून आई आणि मुलाच्या भावून प्रेम प्रसंगावर चित्र रेखाटले.
चित्र साकारण्यासाठी दीड ते दोन तास लागले : पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन यांचे १०० व्या वर्षी दुःखद निधन झाल्याने 'आई आणि मुलाच्या (love between mother and son) भावुक प्रेम' प्रसंगाचे चित्र (picture of emotional love ) रेखाटून पंतप्रधान मोदींच्या आईंना कला शिक्षकांनी श्रद्धांजली (tribute to PM Modis mother) अर्पित केली आहे. चित्राच्या माध्यमातून कै. हिराबेन यांना श्रद्धांजली अर्पित करत असल्याचे सांगितले. कला शिक्षक यश महाजन (Art teacher Yash Mahajan) यांनी दोन बाय दिडच्या साईज बोर्डवर हे चित्र रेखाटले असून त्यांना चित्र साकारण्यासाठी दीड ते दोन तास लागले.
हा संदेश दिला : महाजन यांनी आई आणि मुलाच्या भावून प्रेम प्रसंगावर चित्र रेखाटून श्रद्धांजली दिली असून ईश्वर त्यांच्या आत्मास चिरशांती लाभो व त्यांच्या परिवाराला दुख पेलण्याची ताकद देवो हा संदेश दिला आहे.
अनेक महापुरुषांचे रांगोळी माध्यमांतून चित्र साकारली : महाजन हे श्री वाणी विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, डॉ. कलाम, सावित्रीबाई फुले, अमिताभ बच्चन, यासारख्या अनेक महापुरुषांचे रांगोळी माध्यमांतून चित्र साकारली आहेत.
अनेकांनी हिराबा यांना श्रद्धांजली वाहिली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,( Union Home Minister Amit Shah ) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, ( Defense Minister Rajnath Singh ) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, ( Chief Minister Yogi Adityanath ) उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, बसपा सुप्रीमो मायावती यांच्यासह अनेकांनी हिराबा यांना श्रद्धांजली वाहिली. ( Reaction on PM Modi Mother Death )
मुलासाठी आई म्हणजे संपूर्ण जग - योगी आदित्यनाथ : ( Yogi Adityanath Tweet ) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट केले की, “मुलासाठी आई ही संपूर्ण जग असते. आईचे निधन हे मुलासाठी असह्य आणि कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आदरणीय मातोश्रींचे निधन अत्यंत दुःखद आहे. प्रभू श्री राम दिवंगत पुण्य आत्म्यास आपल्या पावन चरणी स्थान देवो. ओम शांती!