ETV Bharat / state

पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतामध्ये, कांदे-बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान नाही झाले - केंद्रीय मंत्री कपिल पाटील - Union Minister & BJP leader Kapil Patil

गेल्या अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरबाबत देशाच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कदाचित 2024 पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मिर भारतामध्ये येईल (Pakistan-occupied Kashmir soon in India) अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात असे विधान केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (Union Minister & BJP leader Kapil Patil ) यांनी केले आहे.

author img

By

Published : Jan 31, 2022, 10:57 AM IST

Updated : Jan 31, 2022, 12:15 PM IST

ठाणे: कल्याणात सुभेदार वाडा कट्ट्यातर्फे आयोजित रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलताना कपिल पाटील म्हणाले काश्मिरमधील 370 आणि 35 ए कलम हटवल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही.नरसिंह राव यांचे उदाहरण दिले होते. तसेच नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी पार्लमेंटचे संयुक्त अधिवेशन घेत कायदा पारित करून घेतला. ज्यामध्ये असे नमूद केले होते की काश्मिर ही देशाची फार मोठी समस्या आहे. पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात असून हा भाग भारताने घेतल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. त्याचा दाखला देत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना उत्तर दिले की हे तुमचेच काम आहे, तुमच्याकडून झाले नाही म्हणून आम्ही करतोय अशी आठवणही त्यांनी सांगितली.

  • #WATCH | Thane, Maharashtra: Union Minister & BJP leader Kapil Patil says, "...Hope PoK (Pakistan Occupied Kashmir) is integrated in India by 2024 as these things can be done only by PM Modi. For this we'll have to come out of (the mindset for) potato, onions, pulses." (29.01.22) pic.twitter.com/H3dKO5aBd6

    — ANI (@ANI) January 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
कांदे बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान झाले नाहीत..कपिल पाटील शेवटी म्हणाले कि, आता आपण वाट बघूया कदाचित 2024 पर्यंत काही तरी होईल. आणि पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करायला काहीही हरकत नाही. या सगळ्या गोष्टी केवळ मोदी करू शकतात केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. तर कांदे बटाटे, तूरडाळ, मुगडाळ यांच्या महागाईतून आपण बाहेर आले पाहिजे. देशच नसेल तर कांदे बटाटे कुठून खरेदी करणार? महागाईचे समर्थन कोणीही करू शकणार नसून कांदे बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नसल्याचेही केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Jan 31, 2022, 12:15 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.