ठाणे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमितकुमार अनिलकुमार गुप्ता (वय 32) हा नवीमुंबई भागातील घणसोली येथे कुटूंबासह राहतो. तो ओला टॅक्सी चालक आहे. २३ जुलै रोजी दुपारी अमितकुमार हा ठाणे शहरात असताना त्याला ठाणे ते कल्याण येण्यासाठी प्रवाशी भाडे असल्याचा मॅसेज आला होता. ठरल्याप्रमाणे तो अज्ञात प्रवाशाला घेऊन कल्याणच्या दिशेने निघाला. दुपारी अडीचच्या सुमारास ओला कार कल्याण पश्चिम भागातील रामबाग झिरो नंबर गल्लीतील एका बेकरी जवळ येताच, कारमध्ये बसलेल्या प्रवाशाने कार बाजूला घेण्यास सांगितले.
कार बाजूला घेत असतानाच त्या प्रवाशाने कमरेला असलेला धारदार चाकू काढला. आणि कारमध्येच एका हाताने अमितकुमारच्या गळ्याला घट्ट पकडून दुसऱ्या हाताने चाकू गळ्याला लावला. अचानक घडलेल्या घटनेमुळे भयभीत होऊन चालकाने त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रवाशाने शिविगाळ करत चाकूने ठार मारण्याची धमकी देत पैशाची मागणी केली. त्याच्या धमकीला घाबरून चालकाने स्वतः जवळील सात हजराची रोकड त्या प्रवाशाला दिली.
मात्र त्या प्रवाशाला आणखी रोकड पाहिजे असल्याने त्याने पुन्हा धमकी देऊन चालक अमितकुमारच्या मोबाईल फोन मधून गुगल पे द्वारे पैसे ट्रान्सफर करत तो प्रवासी फरार झाला. दरम्यान, घटनेनंतर ओला कारचालकाने महात्मा फुले पोलीस चौकी पोलीस ठाणे गाठत त्या अज्ञात प्रवाशा विरोधात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून भादंवि कलम 392, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी फरार प्रवाशाचा शोध सुरू केला आहे. प्रवाशांसाठी सोपी आणि सहज उपलब्द होणाऱ्या प्रवासासाठी ओला सारख्या सेवा ओळखल्या जातात. मात्र त्यांच्या बाबतीत चित्र विचीत्र प्रकार घडताना पहायला मिळत आहेत.
हेही वाचा
- Gutkha Seized In Bhiwandi: भिवंडीत रहिवासी इमारती ठरताहेत गुटखा तस्करांचा अड्डा, पाच लाखांचा गुटखा जप्त
- Shambhuraj Desai : डोंगर भागातील नागरिकांना तात्काळ स्थलांतरित करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आदेश
- Heavy Rainfall in Thane : ठाणे जिल्ह्यात मुसळधार; बेजबाबदार नागरिकांची लहान मुलांसह धबधब्यांवर गर्दी