ठाणे - ग्रामीण भागात शेती जंगल नष्ट करून त्या ठिकाणी मोठं मोठी गृह संकुल व कंपन्या उभारण्यात येत आहे. अशाच एका कंपनीचे काम सुरु असताना भल्यामोठ्या २० फूट खोल खड्यात कोब्रा नाग पडला होता. मात्र त्या नागाला बाहेर पडता येत नसल्याने अखेर सर्पमित्राने जेसीबीच्या बकेटमध्ये बसून २० फूट खोल खड्ड्यात उतरून त्या नागाला वाचवत जीवदान दिले आहे.
२० फूट खोल खड्ड्यातून बाहेर काढत 'कोब्रा' नागाला दिले जीवनदान - 20 फुट खोल विहिरीत पडला कोब्रा
एका भल्यामोठ्या साचलेल्या पाण्यातील खड्यात कोब्रा नाग कामगाराला दिसला होता. त्याने नागाची माहिती साईट सुपरवाझर देऊन कोब्रा नागाला बाहेर येता यावे म्हणून बांबू व शिडी लावण्यात आली होती. सर्पमित्रला या घटनेची माहिती साईट सुपरवायजर दिली. माहिती मिळताच सर्पमित्राने घटनास्थळी धाव घेऊन या कोब्रा नागाला वाचविण्यासाठी चक्क जेसीबीच्या बकेटमध्ये बसून २० फूट खोल खड्यात उतरला. काही वेळातच या कोब्रा नागाला शिताफीने पकडून बाहेर काढून पिशीव बंद केले.
नागाला वाचवताना सर्पमित्र
ठाणे - ग्रामीण भागात शेती जंगल नष्ट करून त्या ठिकाणी मोठं मोठी गृह संकुल व कंपन्या उभारण्यात येत आहे. अशाच एका कंपनीचे काम सुरु असताना भल्यामोठ्या २० फूट खोल खड्यात कोब्रा नाग पडला होता. मात्र त्या नागाला बाहेर पडता येत नसल्याने अखेर सर्पमित्राने जेसीबीच्या बकेटमध्ये बसून २० फूट खोल खड्ड्यात उतरून त्या नागाला वाचवत जीवदान दिले आहे.
Last Updated : Mar 29, 2022, 5:09 PM IST