ETV Bharat / state

ठाण्यात मनसे, राष्ट्रवादीची पालिका निवडणुकीसाठी आघाडी? - mns news

2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे शहर मतदारसंघातून मनसेला केवळ ८ हजार ३७२ मते मिळाली होती. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मदतीने मनसेच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून ७२ हजारांपर्यंत मते घेणाऱ्या मनसेने भाजपचे मोठ्या प्रमाणात मताधिक्य घटवले असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

ठाण्यात मनसे राष्ट्रवादीची पालिका निवडणुकीसाठी आघाडी?
author img

By

Published : Nov 7, 2019, 2:46 PM IST

ठाणे - विधानसभेच्या निकालानंतर ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीची राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. या दोन्ही महापालिकेत राष्ट्रवादी आणि मनसेची नवी युती उदयास येण्याची चिन्हे आहेत. तसे संकेतही या दोन्ही पक्षांनी निवडणुकीमध्येही आणि निकालानंतरही दिले आहेत.

ठाण्यात मनसे राष्ट्रवादीची पालिका निवडणुकीसाठी आघाडी?

हेही वाचा - पनवेल महानगरपालिकेची अनधिकृत आठवडी बाजारांवर कारवाई

2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे शहर मतदारसंघातून मनसेला केवळ ८ हजार ३७२ मते मिळाली होती. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मदतीने मनसेच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून ७२ हजारांपर्यंत मते घेणाऱ्या मनसेने भाजपचे मोठ्या प्रमाणात मताधिक्य घटवले असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे कल्याण ग्रामीण मतदारसंघातही संपूर्ण राज्यात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे ९३ हजार ८१८ मतांनी निवडून आल्याने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मनसेची ताकद यानिमित्ताने वाढली असून दोन्ही महापालिकेत सत्ताधाऱ्यांना शह देण्याचे मनसुबे राष्ट्रवादी आणि मनसेने आतापासूनच आखायला सुरुवात केली आहे. तर याबाबत दोन्ही पक्षांचे पक्षप्रमुख काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - बदलापूर-रमेशवाडी मार्गावर डंपर-दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

राज्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले असून शरद पवार यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे राष्ट्रवादी पक्षाला चांगलीच उभारी मिळाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर विधानसभा आणि कल्याण ग्रामीण या दोन मतदारसंघाचे निकाल देखील सत्ताधाऱ्यांना विचार करायला लावणारे आहेत. महायुतीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे संजय केळकर आणि मनसेच्या अविनाश जाधव यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळाली. या मतदारसंघात शिवसेनेने दावा करूनही भाजपने तो आपल्याकडे घेतल्याने ती नाराजी काही प्रमाणात शिवसैनिकांमध्ये होतीच. या मतदारसंघात सुरुवातीला काँग्रेसने आपला दावा सांगितला होता. तशाप्रकारची तयारी देखील काही काँग्रेसच्या मंडळींनी केली होती. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीच्यावतीने सुहास देसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी राजकीय खेळी करत सुहास देसाई यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर करत मनसेच्या अविनाश जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन तेव्हाच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची राजकीय गणिते मनसे आणि राष्ट्रवादीकडून आखायला सुरुवात झाली होती.

ठाणे शहर विधानसभेच्या निकालानंतर भाजपच्या संजय केळकर हे केवळ २० हजारांचे मताधिक्य घेऊन या निवडणुकीत विजयी झाले आहेत. हे २० हजारांचे मताधिक्य भाजपच्या दोन पॅनल असलेल्या नगरसेवकांच्या माध्यमातून मिळाले आहे. यामध्ये ९ हजारांच्या लीड २१ नंबरच्या पॅनलमधून तर ८ हजारांचा लीड ७ हजारांचा लीड संजय केळकर यांना मिळाला आहे. या दोन पॅनलमधून जर संजय केळकर यांना मताधिक्य मिळाले नसते तर कदाचित ठाणे शहर मतदारसंघाचे चित्र वेगळे असते असे मत राजकीय वर्तुळातुन व्यक्त केले जात आहे. ठाणे महापालिकेत मनसेचा एकही नगरसेवक नाही तर कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेच्या नगरसेवकांची संख्या ९ आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ही ३४ असून कल्याण डोंबिवली महापालिकेत राष्ट्रवादीचे केवळ दोनच नगरसेवक आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेत मनसे लहान भावाची भूमिका तर राष्ट्रवादी मोठा भाऊ तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसे मोठा भाऊ तर राष्ट्रवादी लहान भावाची भूमिका बाजवणार असल्याची चर्चा आता सुरू आहे.

लोकसभा आणि विधानसभामध्ये राष्ट्रवादी आणि मनसे जशी एकत्र आली तसाच पॅटर्न राहिला तर दोन्ही पक्षाला त्याचा फायदा होईल. पक्षश्रेष्ठी म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेतील ते दोन्ही पक्षाला मान्य असेल, जर असे झाल्यास जागा वाटपाचा समीकरणं बघता येईल आणि सत्ताधाऱ्याना याचा फटका नक्की बसेल. जास्तीत जास्त जागा या दोन्ही पक्षांच्या येतील असा दावा मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक केला आहे .

एक नजर ठाणे महापालिका क्षेत्रातील नगरसेवकांची आकडेवारी

ठाणे महापालिकेतील पक्षीय बलाबल -

शिवसेना - ६७
राष्ट्रवादी - ३४
भाजप- २३
काँग्रेस - २
अपक्ष - २
एमआयएम - ३
एकूण - १३१

जर दोन्ही पक्ष एकत्र पुन्हा पालिका स्तराव आल्यास मनसे आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढू शकतात, असे मत जेष्ठ पत्रकार नामदेव पाषाणकर यांनी व्यक्त केले. तर, दुसरीकडे जनतेची कामे होणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने हे दोन्ही पक्ष विधानसभेत एकत्र आले त्याचपद्धतीने पालिका निवडणुकीत आले तर उत्तम होईल, असे मत नागरिक मांडत आहेत.

Intro:ठाण्यात मनसे राष्ट्रवादीची पालिका निवडणुकीसाठी होणार आघाडी विधानसभे नंतर मनसे राहणार राष्ट्रवादीसोबत?Body:ठाणे विधानसभेच्या निकालानंतर ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीची राजकीय गणिते बदलणार असून या दोन्ही महापालिकेत राष्ट्रवादी आणि मनसेची नवी युती उदयास येण्याची चिन्हे आहेत. तसे संकेतही या दोन्ही पक्षांनी निवडणुकीमध्येही आणि निकालानंतरही दिले आहेत. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे शहर मतदार संघातून मनसेला केवळ ८३७२ मते मिळाली होती, मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मदतीने मनसेच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून ७२ हजारांपर्यंत मते घेणाऱ्या मनसेने भाजपचे मोठ्या प्रमाणात मताधिक्य घटवले असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे कल्याण ग्रामीण मतदार संघातही संपूर्ण राज्यात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे ९३८१८ मतांनी निवडून आल्याने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मनसेची ताकद यानिमित्ताने वाढली असून दोन्ही महापालिकेत सत्ताधाऱ्यांना शह देण्याचे मनसुबे राष्ट्रवादी आणि मनसेने आतापासूनच आखायला सुरुवात केली आहे . तर या बाबत दोन्ही पक्षाचे पक्ष प्रमुख काय निर्णय घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
ठाणे विधानसभेच्या निवडणुकीचे धक्कादायक निकाल राज्यात अनेक ठिकाणी लागले असून शहर पवार यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे राष्ट्रवादी पक्षाला चांगलीच उभारी मिळाली आहे . ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर विधान सभा आणि कल्याण ग्रामीण या दोन मतदार संघाचे निकाल देखील सत्ताधाऱ्यांना विचार करायला लावणारे आहेत. महायुतीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे शहर मतदार संघात भाजपचे संजय केळकर आणि मनसेच्या अविनाश जाधव यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळाली. या मतदार संघात शिवसेने दावा करूनही भाजपने तो आपल्याकडे घेतल्याने ती नाराजी काही प्रमाणात शिवसैनिकांमध्ये होतीच. या मतदार संघात सुरुवातीला काँग्रेसने आपला दावा सांगितला होता. तशाप्रकारची तयारी देखील काही काँग्रेसच्या काही मंडळींनी केली होती. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीने सुहास देसाई याना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. मात्र ऐनवेळी राजकीय खेळी करत सुहास देसाई यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर करत मनसेच्या अविनाश जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन तेव्हाच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची राजकीय गणिते मनसे आणि राष्ट्रवादीकडून आखायला सुरुवात झाली होती.
ठाणे शहर विधानसभेच्या निकालानंतर भाजपच्या संजय केळकर हे केवळ २० हजारांचे मताधिक्य घेऊन या निवडणुकीत विजयी झाले आहेत. हे २० हजारांचे मताधिक्य भाजपच्या दोन पॅनल असलेल्या नगरसेवकांच्या माध्यमातून मिळाले आहे. यामध्ये ९ हजाराच्या लीड २१ नंबरच्या पॅनलमधून तर ८ हजारांचा लीड ७ हजारांचा लीड संजय केळकर यांना मिळाला आहे. या दोन पॅनलमधून जर संजय केळकर यांना मताधिक्य मिळाले नसते तर कदाचित ठाणे शहर मतदार संघाचे चित्र वेगळे असते मत राजकीय वर्तुळातुन व्यक्त केले जात आहे. ठाणे महापालिकेत मनसेचा एकही नगरसेवक नाही तर तर कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेचेच्या नगरसेवकांची संख्या ९ आहे . ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ही ३४ असून कल्याण डोंबिवली महापालिकेत राष्ट्रवादीचे केवळ दोनच नगरसेवक आहेत . त्यामुळे ठाणे महापालिकेत मनसे लहान भावाची भूमिका तर राष्ट्रवादी मोठा भाऊ तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसे मोठा भाऊ तर राष्ट्रवादी लहान भावाची भूमिका बाजवणार असल्याची चर्चा आता पालिका चर्चा रंगू लागल्या आहे ..

लोकसभा आणि विधान सभा मध्ये राष्ट्रवादी आणि मनसे जशी एकत्र आली तसाच पॅटर्न राहिला तर दोन्ही पक्षाला त्याचा फायदा होईल . तसेच पक्ष श्रेष्ठ म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेतील ते दोन्ही पक्षाला मान्य असेल . जर असे झाल्यास जागा वाटपाचा फॉर्मुला बघता येईल आणि सत्ता धाऱ्याना याचा फटका नक्की बसेल . जास्तीत जास्त जागा या दोन्ही पक्षाच्या येतील असा दावा मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक केला आहे .
BYTE : अविनाश जाधव - मनसे ठाणे ,पालघर जिल्हा अध्यक्ष

तर एक नजर टाकूया ठाणे महापालिका क्षेत्रातील नगरसेवक यांची संख्या बळाबळ वर ..

ठाणे महापालिकेतील पक्षीय बलाबल -
-----------------------------------------
शिवसेना - ६७
राष्ट्रवादी - ३४
भाजप- २३
काँग्रेस - २
अपक्ष - २
एम. आय . एम - ३
-----------------------------------------
एकूण - १३१
जर दोन्ही पक्ष एकत्र पुन्हा पालिका स्तराव आल्यास मनसे आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढू शकतात असे मत जेष्ठ पत्रकार नामदेव पाषाणकर यांनी व्यक्त केले .. तर दुसरीकडे जनतेची कामे होणे गरजेचे आहे ज्या पद्धतीने हे दोन्ही पक्ष विधान सभेत एकत्र आले त्याच पद्धतीने पालिका क्षेत्रात आले तर उत्तम होईल असे मत नागरिक मांडत आहे ..
BYTE : नामदेव पाषाणकर - जेष्ठ पत्रकार
BYTE : ठाणेकर १,२ Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.