मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर शहरातील कोरोनाबधितांची संख्या ५ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात मीरा भाईंदरमध्ये २१३ नवे रुग्णांची नोंद झाली आहे. आज २१३ रुग्णांचा वैद्यकीय चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. तर रुग्णालयात उपचारादरम्यान आज २ जणांचा मृत्यूदेखील झाला आहे.आज दिवसभरात १७३ रुगणांनी कोरोनावर मात केली आहे.
आतापर्यंत मिरा भाईंदर शहरात ३८०२ जणांनी कोरोनावर मात केली असून एकूण मृत्यूची संख्या १८०वर पोचली आहे. मीरा भाईंदर कोरोनाबधितांची एकूण ५२०६ संख्या झाली असून, ८९० रुग्णांचा कोविड अहवाल प्रतीक्षेत आहे. तर १२२४ जणांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज आढळून आलेल्या २१३ रुग्णांमध्ये ६९ नवे रुग्ण असून १४४ जण हायरिक्स संपर्कातून लागण झाल्याची प्राथमिक माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी दिली. मीरारोड पूर्व भागात ११२, भाईंदर पूर्व मध्ये ५२ तर भाईंदर पश्चिम परिसरात ४९ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे १० जुलैपर्यंत शहरात कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला होता. परंतु रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे पुन्हा १८ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन कायम करण्यात आला आहे.