काय आहे प्रकरण : ठाण्यातील घोडबंदर येथील अभियंता अनंत करमुसे यांनी एप्रिल 2020 मध्ये ठाकरे सरकारमधील तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याचा रागातून आव्हाड यांचे अंगरक्षक पोलीस आणि कार्यकर्त्यांनी करमुसे यांना घरातून उचलून आव्हाड यांच्या निवासस्थानी आणले. आव्हाड यांच्या नाद या निवासस्थानी करमुसे यांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आव्हाड यांचे स्वीय सहायकासह सहा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या तिघांची विभागीय चौकशी करण्यात आली,पण पोलिसांना आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. ही घटना घडून साधरण दीड वर्ष उलटून गेल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाने उचलले.
90 दिवसात अहवाल देण्याचे आदेश : उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. वर्तकनगर पोलीस ठाण्यात ६ एप्रिल २०२० माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६६ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२१ ला आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान आनंद करमुसे यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायलयाने ठाणे पोलिसांना ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
हेही वाचा -