ठाणे - एकात्मिक बाल विकास सेवा लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही. त्यामुळे महिला बाल विकास प्रकल्प अंतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला. मात्र ठाणे जिल्ह्यातील डोळखांब-शहापूर तालुक्यातील कसारा- पाटीलवाडी या बालकाच्या पोषणसाठी पुरवली जाणारी साखर अतिशय निकृष्ट व आरोग्य घातक असल्याचे समोर आले आहे. या साखरेमुळे बालकांना विष बाधा होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगत श्रमजीवी संघटनेने संबधित पुरवठा करणाऱ्या तसेच महिला बाल विकास प्रकल्पच्या संबधित अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शहापूर पंचायतचे गटविकास अधिकाऱ्याकडे केली आहे.
यामुळेच वाढते कुपोषित बालकांची संख्या
ठाणे जिल्ह्यातील डोळखांब-शहापूर तालुक्यातील कसारा नजीक असलेल्या पाटीलवाडी येथील अंगणवाडीत जय गणेश ठाकरे (वय ५) हा अंगणवाडीत शिक्षण घेत आहे. जय सह इतरही बालकांना पुरवठा ठेकेदाराकडून तांदूळ, मिठ, मिरची, हळद, मसूर, डाळ, हरभरा, व साखर दिली जात आहे. मात्र यापैकी साखर अतिशय खराब असुन खाण्यास अपायकारक असल्याचे दिसून आले आहे. बाल विकास विभागाच्या शहापूर आणि डोळखांब प्रकल्पा अंतर्गत तालुक्यात एकूण ५६९ अंगणवाड्या कार्यरत असून शहापूर प्रकल्पातील अंगणवाडयामध्ये ० ते ६ वयोगटात १३ हजार ५४४ तर डोळखांब प्रकल्पातील अंगणवाड्यामध्ये ११ हजार ९०६ बालके अशी एकूण २५ हजार ४५० बालके सर्वेक्षित आहेत. यापैकी शहापूर प्रकल्पात सद्यस्थितीला ० ते ६ वयोगटातील १६ बालके गेल्यावर्षी तीव्र कुपोषित (सॅम) आणि २४४ बालके मध्यम कुपोषित (मॅम) आढळून आले. तर डोळखांब प्रकल्पात ७४ तीव्र कुपोषित (सॅम) आणि ३४५ मध्यम कुपोषित (मॅम) बालके आढळून आले आहेत. अशाप्रकारे दोन्ही प्रकल्पात मिळून तालुक्यात एकूण ९० बालके तीव्र कुपोषित तर ५८६ बालके मध्यम कुपोषित गेल्यावर्षी आढळून आले आहेत.
पुरवठा ठेकेदारासह अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
कोरोनामुळे दुसऱ्या वर्षीही अंगणवाडी केंद्र बंद असल्याने अंगणवाडी सेविका-मदतनीस किंवा ठेकेदारांच्या मार्फत लाभार्थाच्या घरोघरी जाऊन महिनाभराचा पोषण आहार वाटप करण्यात येत आहेत. यामध्ये ६ हजार ३०० महिला व ३८ हजार बालकांचा समावेश आहे. एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये गहू, तांदूळ, कडधान्य, खाद्यतेल, गूळ, साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला याचा समावेश आहे. तसेच अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना अंडी/केळी/स्थानिक फळे असा अतिरिक्त आहार दिला जात आहे. मात्र यामधील साखर निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगत श्रमजीवी संघटनेचे शहापूर तालुका सचिव प्रकाश खोडक यांनी संबधित पुरवठा ठेकेदार व महिला बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाईसाठी शहापूरचे गटविकास अधिकारी यांचेकडे लेखी तक्रारी अर्जाद्वारे मागणी केली आहे.
अंगणवाडी बालकांना निकृष्ट साखरेचे वाटप; विषबाधेची शक्यता - inferior sugar in anganwadi
ठाणे जिल्ह्यातील डोळखांब-शहापूर तालुक्यातील कसारा-पाटीलवाडी या बालकाच्या पोषणसाठी पुरवली जाणारी साखर अतिशय निकृष्ट व आरोग्य घातक असल्याचे समोर आले आहे.