ETV Bharat / state

मुंबई-नाशिक महामार्गावर गॅस टँकर उलटला; एकाचा मृत्यू - Mumbai nashik highway

एलपीजी गॅस टँकर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असतांना सोनाळे गावच्या हद्दीत या टँकरने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. टँकरचालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने एलपीजी भरलेला गॅस टँकर पुढे जाऊन उलटला. या टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अपघात
अपघात
author img

By

Published : Apr 24, 2021, 8:07 PM IST

ठाणे - दुचाकीस्वारास भरधाव एलपीजी गॅस टँकरची जोरदार धडक लागल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर गॅस टँकरदेखील उलटला. हा अपघात मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे गावच्या हद्दीत आज (शनिवारी) सायंकाळच्या सुमारास घडली. उलटलेल्या एलपीजी गॅस टँकरमधून गॅस गळती होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून खबरदारीचा उपाय म्हणून या महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले आहे.

गॅस गळतीने खळबळ, टँकरचालक फरार -

एलपीजी गॅस टँकर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असतांना सोनाळे गावच्या हद्दीत या टँकरने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. टँकरचालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने एलपीजी भरलेला गॅस टँकर पुढे जाऊन उलटला. या टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान टँकरचालक फरार झाला आहे.

महामार्गावर काही प्रमाणात वाहतूककोंडी

गॅस टँकर उलटल्याने खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ अडवून ठेवली. महामार्गावर काही प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यानंतर हलके वाहने पर्यायी रस्ता म्हणून मुंबई, नाशिक, महामार्गाच्या बाजूला असलेल्या पाइपलाइनच्या रस्त्यावरून सोडण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.