ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने एका ठेकेदाराविरोधात 20 कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मॅथ्यू जॉन कुचिन, अनिल चंदूलाल शहा आणि मेसर्सचे संचालक सीमा अनिल शाह असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून आरोपींमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक -
खडकपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने कल्याणकारी योजनांसाठी जुलै 2005 मध्ये मेसर्स एसएम असोसिएट मॅथ्यू जॉन कुचिन, अनिल चंदूलाल शहा आणि सीमा अनिल शहा नावाच्या संस्थेच्या कंत्राटदारांना कंत्राट दिले होते. कंत्राटदारांनीही काम पूर्ण केले नाही आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची फसवणूक करून मेसर्सच्या नावाने दुसरी कंपनी बनवून 20 कोटी 69 लाख 64 हजार 584 रुपयांचे आर्थिक नुकसान केले.
हे ही वाचा - CORONA VIRUS : राज्यात शनिवारी ३,०७५ नवे रुग्ण, रिकव्हरी रेट 97.05 टक्क्यांवर
महापालिकेच्या मालमत्तेवर बेकायदेशीरपणे कब्जा -
केडीएमसीचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांच्या फिर्यादीनुसार आरोपी ठेकेदारांनी महापालिकेच्या मालमत्तेवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे आणि त्यावर कोट्यवधींचे कर्ज घेऊन ते थर्ड पार्टीच्या स्वाधीन केले आहे. कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी मॅथ्यू जॉन कुचिन, अनिल चंदूलाल शहा आणि मेसर्सचे संचालक सीमा अनिल शाह यांच्या नावावर आर्थिक नुकसान आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.नि. शरद झिने करत आहेत.
हे ही वाचा - Saki Naka Rape Case: बलात्कार प्रकरणात एकच आरोपी, नराधमाला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी