ठाणे - भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावाच्या हद्दीत असलेल्या राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स मधील पेपरच्या गोदामाला आज(शनिवारी) पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलआणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि ठाणे महानगरपालिकेच्या 2 अशा चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर तब्बल पाच तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.
राजलक्ष्मी कॉम्प्लेक्समधील पेपर गोदामला अचानक आग लागली. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटना स्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांती आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या घटनास्थळी कुलींगचे काम सुरू असल्याची माहिती फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीमुळे लाखो रुपयाचे गोदामातील पेपर जळून खाक झाले आहे.