ठाणे - भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात आगीचे सत्र सुरुच असून आज दुपारच्या सुमारास माणकोली गावच्या हद्दीत असलेल्या रासायनिक गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान भीषण आगीच्या धुराचे लोट हवेत पसरल्याने आजूबाजूच्या नागरिकांचे डोळे व घश्याला त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. तर गोदामातील लाखो रुपयांचे रासायनिकचे ड्रम आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात ....
भिवंडीत रासायनिक गोदामाला भीषण आग, आजूबाजूच्या नागरिकांना डोळे-घशाचा त्रास - रासायनिक गोदामाला भीषण आग
भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात आगीचे सत्र सुरुच असून आज दुपारच्या सुमारास माणकोली गावच्या हद्दीतील असलेल्या रासायनिक गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.