ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये कौटुंबिक वादाचे प्रमाण वाढले - lockdown effect

कोरोना संकटात लॉकडाऊन लागल्याने कौटुंबिक आणि घरगुती नातेसंबंधाचे वाद पोलिसांकडे पोहचू लागले आहेत. मागील वर्षी महिला तक्रार निवारण कक्ष आणि नियंत्रण कक्षाकडे 257 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

लॉकडाऊन मध्ये कौटुंबिक वाद वाढले
लॉकडाऊन मध्ये कौटुंबिक वाद वाढले
author img

By

Published : Jun 1, 2021, 1:19 PM IST

ठाणे - कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये कौटुंबिक वादाच्या घटनेत आणि पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारीत वाढ झाली आहे. हे प्रकार सर्वच भागात वाढले आहेत, परंतु ठाणे शहरात जास्त प्रमाणात तक्रारी वाढल्याचे पोलीस दफ्तरी नोंद होत असलेल्या आकडेवारी वरून दिसून येत आहे.

घरगुती वादाचे तब्बल 339 गुन्ह्याची पोलीस दफ्तरी नोंद

कोरोना संकटात लॉकडाऊन लागल्याने कौटुंबिक आणि घरगुती नाते संबंधाचे वाद देखील आता पोलिसांकडे पोहचू लागले आहेत. मागील वर्षी देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण कक्ष आणि नियंत्रण कक्षाकडे 257 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये महिलांच्या विरुद्ध वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यातील 69 तक्रारी या घरगुती हिंसाचाराच्या आहेत. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजेच जानेवारी ते 25 मे 2021 या कालावधीत कौटुंबिक वादाच्या 196 तक्रारी ठाणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. पतीकडून आणि सासरच्या मंडळींकडून हुंडाबळी साठी दाखल होणारे गुन्हे वगळता ठाण्यात कौटुंबिक आणि घरगुती वादाचे 78 गुन्हे 2019 या वर्षभरात दाखल करण्यात आले आहेत. तर मागील चार वर्षात कौटुंबिक आणि घरगुती नातेसंबंधात होणाऱ्या वादाचे तब्बल 339 गुन्हे पोलीस दफ्तरी नोंदवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात या प्रकरणांची संख्या अधिक असू शकते. परंतु, अनेक पीडित महिला तक्रारी नोंदवण्यासाठी पुढे येत नसल्याने तक्रारींची संख्या कमी आहे.

महिलांसाठी विशेष कक्ष महत्वपूर्ण

पोलीस ठाण्यात आलेल्या महिलांच्या तक्रारी या महिला तक्रार निवारण कक्षाकडे पाठवल्या जातात. या ठिकाणी तक्रारींचे निवारण करण्यात येते. मात्र तेथेही निवारण न झाल्यास न्यायालयात जाण्याचा सल्ला तिथे दिला जातो. आतापर्यंत महिला तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातून अनेक भांडणे विकोपाला जाण्यापूर्वीच ती मिटवण्यात आली आहेत.

आर्थिक अडचण हे मोठे कारण

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यासोबत अनेक व्यवसाय ठप्प पडले आहेत आणि त्यामुळे अनेक कुटुंबात वाद निर्माण झाले आहेत. मुलांचे शिक्षण घराचे कर्ज, घर खर्चही या कौटुंबिक कलहाला कारणीभूत ठरले आहेत. अशा वेळी उद्भवलेली परिस्थिती हेच कारण पोलिसांना वाटत आहे. अशा वेळी योग्य समुपदेशन यावर तोडगा ठरू शकतो असे त्यांना वाटत आहे.

हेही वाचा - मनमाड मालेगाव महामार्गावर भीषण; अपघातात दोन जणांचा होरपळून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.