ETV Bharat / state

ठाणे : गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा; नियोजन नसल्याने रेल्वेच्या भुयारी मार्गात साचले पाणी - water stored in the badlapur railway subway

बदलापूरच्या बेलवली हद्दीत रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी असतांना त्याचे नियोजन न करता त्यात भर म्हणून रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत उभारली. मात्र, नागरिकांचा विचार केला नसल्याचा आरोप नागरिकांकडून यावेळी करण्यात आला. त्यातच नागरिकांना स्मशानभूमी गाठण्यासाठी ही वेळ येते. बदलापुरात राहणारे रामचंद पाटील यांचे निधन झाले होते. मात्र, अंत्ययात्रा स्मशानापर्यंत नेताना कुटुंबीयांना मोठा त्रास झाला.

Due to lack of planning, water stored in the badlapur railway subway
गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा
author img

By

Published : Sep 14, 2021, 9:03 PM IST

ठाणे - कोणतेही नियोजन न करता बांधलेल्या बदलापूरच्या रेल्वे भुयारी मार्गात असलेले गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जाण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. बदलापूर शहरातील बेलवली भागात असलेल्या भुयारी मार्गात वर्षभर पाणी साचलेले असते. येथील नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी देऊन लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा आंदोलन केले. मात्र, प्रशासनाला भुयारी मार्गाशी काहीही घेणे-देणे नसल्याचे आज (मंगळवारी) प्रत्यक्षात समोर आले आहे.

घटनास्थळाची दृश्ये

मोबाईलमध्ये दृश्य काढतांना कुटुंबायांचे डोळे पाणावले -

बदलापूरच्या बेलवली हद्दीत रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी असतांना त्याचे नियोजन न करता त्यात भर म्हणून रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत उभारली. मात्र, नागरिकांचा विचार केला नसल्याचा आरोप नागरिकांकडून यावेळी करण्यात आला. त्यातच नागरिकांना स्मशानभूमी गाठण्यासाठी ही वेळ येते. बदलापुरात राहणारे रामचंद पाटील यांचे निधन झाले होते. मात्र, अंत्ययात्रा स्मशानापर्यंत नेताना कुटुंबीयांना मोठा त्रास झाला.

इतकेच काय एकीकडे अंत्ययात्रा घेऊन जात असतांना ही बिकट ही परिस्थिती दाखवण्यासाठी मोबाईलमध्ये दृश्य काढतांना कुटुंबायांचे डोळे पाणावले होते. पालिका आणि रेल्वे प्रशासनाला वारंवार इथे पादचारी पुलाची मागणी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हेही वाचा - पालघर येथील मच्छीमाराने देखाव्यातून वाढवण बंदरसह आदी प्रश्नांकडे वेधले लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.