ETV Bharat / state

दीड वर्षांनी येणाऱ्या अंगारकीला श्री सिद्धिविनायक मंदिर राहणार बंद

कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने टिटवाळा येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक महागणपतीचे मंदिर दीड वर्षांनी येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर विश्वस्तांनी घेतला आहे.

ठाणे
ठाणे
author img

By

Published : Feb 28, 2021, 7:20 PM IST

ठाणे - महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार अत्यंत वेगाने होताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, असे जनतेला आवाहन केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने काही निर्बंध घालण्यात आले आहेत. याच पार्शवभूमीवर टिटवाळा येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक महागणपतीचे मंदिर दीड वर्षांनी येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर विश्वस्तांनी घेतला आहे.

ठाणे
सोमवारी मध्यरात्रीपासून मंदिर भाविकांसाठी बंद

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा वाढता प्रादुभाव पाहता, स्थानिक प्रशासनाकडून गर्दीची ठिकाणे असलेल्या आस्थापनांना नोटीसाही दिलेल्या असतानाच, अंगारकी संकष्टी चतुर्थीला टिटवाळा येथील गणेश मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळत असते. यावर्षी मंगळवार दिनांक २ मार्च रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही दीड वर्षांनी येत आहे. त्यामुळे गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून श्री सिद्धिविनायक मंदिर यांनी सोमवार दिनांक १ मार्च रात्री बारा वाजल्यापासून ते मंगळवार दिनांक २ मार्च रात्री बारावाजेपर्यंत मंदिर हे दर्शनासाठी सर्वांना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भाविकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली असून याबाबची माहिती श्री सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त सुभाष जोशी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.