ठाणे - मीरा भाईंदर महापालिकेमार्फत कोविड केअर कॉल सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. जे रुग्ण गृहविलगीकरणात आहे, अशा रुग्णांच्या दैनंदिन आरोग्य स्थितीची विचारपूस करणे, तसेच त्यांना आवश्यकतेप्रमाणे वैद्यकीय मदत वेळेवर देण्याकरिता मनपातर्फे कॉल सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
ऑर्नेट हेल्थ केयर प्रा.लि. या संस्थेमार्फत हे कोविड केअर कॉल सेंटर चालवण्यात येणार आहे. संस्थेमार्फत मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी सभागृहात प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. तसेच, गृहविलगीकरणाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कॉल सेंटरमार्फत गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना आठवड्यातून एकदा थेट कॉल करून त्यांच्याशी संपर्क करण्यात येणार आहे.
हेही वाचा - मृत्यूचा बनावट दाखला देणारे डॉक्टरांचे 'त्रिकूट' गजाआड; एक फरार
रुग्णांना वैद्यकीय मदत हवी असेल, तर महानगरपालिका मुख्यालयात स्थापन करण्यात आलेल्या 'वॉररूम'मधील डॉक्टरांकडून ही मदत तत्काळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे या सुविधेमार्फत प्रत्येक रुग्णास मानसिक आधार देण्यासाठी समपुदेशन केले जाणार आहे.
हेही वाचा - मृत्यूचा बनावट दाखला देणारे डॉक्टरांचे 'त्रिकूट' गजाआड; एक फरार