ठाणे- जिल्ह्यातील प्लास्टिक उत्पादक कंपनीच्या मालकाला वीजचोरी प्रकरणी दोषी ठरवीत ठाणे जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाचा सश्रम कारावास आणि सव्वा कोटीचा दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. अबुतालिब शमशुद्दीन खान (५७) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्लास्टिक उत्पादक कंपनी मालकाची वीजचोरी प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरु होती. दरम्यान सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील विवेक कडू यांनी युक्तीवादात सांगितले कि, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे भरारी पथक यांनी आरोपी खान यांच्या शीळ महापे येथील कंपनीची १४ जानेवारी २००४ रोजी तपासणी केली. तपासणी दरम्यान पथकाला कंपनीच्या परिसरातील विद्युत मीटरमध्ये फेराफार आणि विद्युत चोरी करित असल्याचे निदर्शनास आले. विद्युत मीटरचे ग्लास आणि मीटर बॉक्स परागंदा असून मीटरवर लावलेले सीलमध्येही फेरफेरी केल्याचे समोर आले. तपासणी दरम्यान कंपनी मालकाने १० लाख ३२ हजार २६ रूपये युनिट वीजचोरी केल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. ही वीजचोरी ५२ लाख ६५ हजार ४३० रुपयांची असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. वीज चोरी गेल्या ३४ महिन्यांपासून सुरु असल्याचेही तपासणीदरम्यान स्पष्ट झाले होते. तेव्हा विद्युत कंपनीच्या भरारी पथकाने कंपनी मालक खान यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीसांनी खानवर वियुत कलम १३५, १३८ नुसार गुन्हा दाखल केला होता.
सदर प्रकरणात न्यायमूर्ती जाधव यांनी निकालात म्हटले, न्यायालयातील साक्ष व पुराव्यांनी आरोपी खान यांच्यावरील आरोप सिद्ध केले आहेत. या वीज चोरी प्रकरणात ४२ लाख १२ हजार ३४४ रुपयांची १० लाख ३२ हजार २६ युनिट वीज चोरी झाली आहे. सदरचा अवहाल सादर केल्यानंतर आरोपी खान याला अतिरिक्त रक्कम दाखविल्याचे स्पष्टीकरण देण्यात अपयश आले. आरोपी खान याला वीजचोरी होत असल्याचे माहित होते. पण आज कंपनी मालक मालकीबाबतचा हक्क नाकारत आहे. त्यामुळे खटल्यात कंपनीच्या वीजचोरीचा विचार करणे गरजेचे आहे. दरम्यान वीजचोरी कायद्यानुसार आरोपी खान याला दोन वर्षाचा सश्रम कारावास आणि विजचोरीच्या तीनपट रक्कम एकून सव्वा कोटीचा दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.