ठाणे : कल्याण पश्चिमेकडील ग्रामीण भागात मोठमोठी जंगले, शेती नष्ट करून इमारती उभारल्या जात आहे. त्यातच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने बिळातून विषारी – बिन विषारी साप (Venomous - non-venomous snakes) भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसापासून वाढल्या आहेत. त्यातच कल्याण पश्चिम परिसरात गोळ्वली गावात मासेमारी करणारे कुटूंब राहते. त्यांच्या घरासमोरच मासेमारीचे जाळे ठेवले होते.त्या जाळ्यात रात्रीच्या सुमारास अचानक घरातील एका सदस्याला जाळ्यात कोब्रा नाग दिसला. त्यांनी या विषारी नागाला हुसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र कोब्रा नाग (poisonous cobra snake) आणखीनच जाळ्यात दळून बसला. त्यांनतर त्यांनी जाळ्यात नाग असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोबे आणि हितेश यांना दिली. सर्पमित्र घटनास्थळी पोहचून शिताफीतीने या कोब्रा नागाला तंगूसचे जाळे ब्लेड व चाकूने कापून नागाला बाहेर काढून पिशवीत बंद केल्याने मासेमारी करणाऱ्या कुटूंबानी सुटकेचा निश्वास घेतला आहे.
निर्सगाच्या सानिध्यात सोडून जीवदान - हा विषारी नाग इंडियन कोब्रा (Indian cobra) जातीचा साप असून साडे चार फूट लांबीचा होता. या नागाला कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्याची परवागी घेवून जंगलात निर्सगाच्या सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली. तर दुसरीकडे हवामानात बदल झाल्याने साप भक्ष्य व उब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानवी वस्तीत शिरत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे असून कुठेही मानवी वस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना याची माहिती तत्काळ देण्याचे अहवान त्यांनी नागरिकांना केले आहे.
हेही वाचा : Osmanabad Froud Case : शेतकऱ्यांची फसवणूक करणारा अखेर जेरबंद, बुलढाणा व परंडा पोलिसांची धाडसी कारवाई