ETV Bharat / state

ठाण्यात अल्पवयीन मुलीवर सत्तर वर्षीय नराधमाचा अत्याचार - अल्पवयीन मुलीवर अत्याचार

13 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीच्या आईशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत, पीडितेवर 70 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही बाब पीडितेच्या शाळेमधील वैद्यकीय तपासणीमध्ये समोर आली. याप्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी आरोपीवर 'पोक्सो' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करित नराधमाला बेड्या ठोकल्या. तुळशीराम आंबोरे असे आरोपीचे नाव आहे.

child physical abused by seventy year old accused in thane
ठाण्यात अल्पवयीन मुलीवर सत्तर वर्षीय नराधमाचा अत्याचार
author img

By

Published : Nov 30, 2019, 10:21 AM IST

ठाणे - 13 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीच्या आईशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत, पीडितेवर 70 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही बाब पीडितेच्या शाळेमधील वैद्यकीय तपासणीमध्ये समोर आली. याप्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी आरोपीवर 'पोक्सो' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करित नराधमाला बेड्या ठोकल्या. तुळशीराम आंबोरे असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा - अज्ञात टोळक्याकडून अट्टल गुन्हेगाराचा भरदिवसा खून

टिटवाळा पूर्व परिसरात आरोपी राहतो. मजुरीच्या कामानिमित्ताने मुलीच्या आईशी त्याची ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेऊन गैरकृत्य साधण्यासाठी मुलीच्या आईला टिटवाळ्यात घर भाड्याने घेण्यासाठी मदत केली. तिची आई इतर ठिकाणी घरकामासाठी सकाळी घरातून बाहेर जाऊन संध्याकाळी उशीरा येत असे. तसेच मुलगी शाळेतून आल्यानंतर ती घरी एकटी असल्याचा फायदा घेत जबरदस्तीने घरात घुसून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान, मुलीच्या शाळेमध्ये वैद्यकीय तपासणीवेळी डॅाक्टरांना तीने घडलेला प्रकार सांगितला. त्यांनतर शिक्षकांनी तत्काळ मुलीच्या आईला सांगितले. याप्रकरणी आईने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करित नराधम तुळशीरामला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे करित आहेत.

हेही वाचा - पुण्यातील वारजे पुलाखाली बॅगेत आढळला मृतदेह

Intro:kit 319Body:१३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७० वर्षीय नराधमाचा अत्याचार; अत्याचारी गजाआड

ठाणे :- एका १३ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीच्या आईशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत, तिच्यावर ७० वर्षीय नराधमाने बळजबरीने तिच्या राहत्या घरात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पीडितेच्या शाळेमध्ये वैद्यकीय तपासणीवेळी हा प्रकार समोर आला. याप्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी नराधमावर बलात्कारासह "पोक्सो" कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करीत नराधमाला बेड्या ठोकल्या आहे. तुळशीराम आंबोरे असे अत्याचारी नरधमाचे नाव आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार टिटवाळा पुर्व परीसरात नराधम तुळशीराम राहतो, मजुरीच्या कामा निमित्ताने पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईशी ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेऊन गैरकृत्य साधण्यासाठी पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईला टिटवाळ्यात घर भाड्याने घेण्यासाठी मदत केली. पिडीत मुलीची आई इतर ठिकाणी घरकामासाठी सकाळी घरातून बाहेर जाऊन संध्याकाळी उशीरा येत असे, तसेच पीडित अल्पवयीन मुलगी सकाळी शाळे जाऊन आल्यानंतर दुपारच्या सत्रात तिचा भाऊ शाळेत जात असल्याने दुपारपासून सायंकाळ पर्यत पीडितमुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत जबरदस्तीने घरात घुसून बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला.

दरम्यान, पिडीत अल्पवयीन मुलीच्या शाळेमध्ये वैद्यकीय तपासणीवेळी पीडित मुलीने डाँक्टराना तिच्यावर घडलेला प्रकर सांगितला. त्यांनतर शिक्षकांनी तत्काळ पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईला सांगताच तिला धक्काच बसला. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करीत नराधम तुळशीरामला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे करीत आहेत.

Conclusion:titvala
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.