ठाणे : बारमध्ये गाणी गात संसाराचा गाडा ओढणाऱ्या पिडीत महिलेला अखेर Etv भारतच्या बातमीमुळे न्याय मिळण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. ठाण्यातील सावरकर नगर येथे आपल्या मुलांसोबत राहणाऱ्या कुसुम ( नाव बदलेले आहे ) यांच्यावर एका पोलीस कर्मचाऱ्यांने लग्नाचे अमिष दाखवत वारंवार बलात्कार केला ( Rape by luring marriage ) आहे. या प्रकरणी Etv भारतने केलेल्या पाठपुऱ्याव्यामुळे आरोपी अंबादास खेडकर ( Ambadas Khedkar ) यांच्याविरोधात गुन्हा ( case registered against accused police ) दाखल करण्यात आला आहे.
तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ - त्यांच्यावर अंबादास खेडकर या पोलीस कर्मचाऱ्याने लग्नाचे अमिष दाखवत वारंवार बलात्कार ( Rape by luring marriage ) केला आहे. दोघेही लग्न न करताच लिवइन रिलेशनमध्ये रहात होते. अंबादासने पीडीतेला बेदम मारहाण केल्याने वर्तकनगर पोलिसात तक्रार देखील दिली होती. परंतु एका पोलीसाच्या विरोधात तक्रार असल्याने वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल ( case registered against accused police ) करण्यास टाळाटाळ केली होती.
Etv भारतचा इम्पॅक्ट - Etv भारतने केलेल्या वार्तांकनामुळे अखेर महिलेला न्याय मिळण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. Etv भारतने केलेल्या पाठपुऱ्याव्यामुळे आज अखेर वर्तकनगर पोलिसांनी आरोपी अंबादास खेडकर ( Ambadas Khedkar ) या कारागृह पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात भादंवि ३७६, ३२३,५०६ या कलमांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.