ठाणे - जिल्ह्यातील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पाईपलाईनमधून गुरुवारी सकाळी डिझेलची गळती झाली. त्यानंतर दुरुस्तीच्या कामासाठी परिसराची नाकेबंदी करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. ठाण्यातील शिल येथील गॅस गोदामाजवळ 18 इंच उच्च दाबाच्या डिझेल पाईपलाईनमधून सकाळी 5.21 वाजता गळती सुरू झाली आणि परिसरात इंधन सांडले, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी दिली.
डिझेल पुरवठा बंद करावा लागला - ठाणे शहरातील शीळ फाटा परिसरात सकाळी चोरट्यांच्या टोळीने पाईल लाइनमधून डिझेल चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे पाईपमध्ये छोटीशी गळती झाली होती. त्यामुळे कंपनीला डिझेल पुरवठा बंद करावा लागला. मात्र, काही वेळाने पुरवठा पूर्ववत झाला.
इंधन परिसरात पसरली - बीपीसीएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाइपलाइन आता पूर्णपणे कार्यरत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी सांगितले की, गुरुवारी पहाटे ५.२१ वाजता ठाण्याजवळील शीळ फाटा येथील गॅस गोदामाजवळ १८ इंच उच्च दाबाच्या डिझेल पाइपलाइनमधून गळती सुरू झाली आणि इंधन परिसरात पसरली.
गळती बंद करण्याचे काम सुरू - दुरुस्तीचे काम सुरू असताना या भागात बॅरिकेड करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. नवी मुंबई पोलीस अधिकारी, स्थानिक अग्निशमन दल आणि बीपीसीएलचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि गळती बंद करण्याचे काम सुरू केले. ही पाइपलाइन मुंबई आणि मनमाडला जोडणारी २५२ किमी लांबीची आहे.