ETV Bharat / state

धक्कदायक..! हेडफोनच्या वादातून मित्राची चाकूने भोसकून हत्या; आरोपी अटकेत - हत्या

मित्रांमध्ये दारूची पार्टी सुरू असतानाच दोघा मित्रांमध्ये हेडफोनवरुन वाद सुरू झाला. हा वाद एवढा विकोपाला गेली हेडफोन मागणाऱ्या मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. ही धक्कादायक घटना उल्हासनगर मधील 4 नंबर भागातील सोंग्याची वाडी परिसरात घडली आहे.

c
c
author img

By

Published : Sep 18, 2021, 8:45 PM IST

ठाणे - मित्रांमध्ये दारूची पार्टी सुरू असतानाच दोघा मित्रांमध्ये हेडफोनवरुन वाद सुरू झाला. हा वाद एवढा विकोपाला गेली हेडफोन मागणाऱ्या मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. ही धक्कादायक घटना उल्हासनगर मधील 4 नंबर भागातील सोंग्याची वाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मित्राला बेड्या ठोकल्या आहे. सूरज शिंदे, असे अटक आरोपीचे नाव आहे तर ज्ञानेश्वर सोनवणे, असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे. उल्हासनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दुसरी हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

आरोपी जेलमधून सुटला होता पॅरोलवर

मृत ज्ञानेश्वर सोनवणे हा उल्हासनगर कॅम्प चार भागात राहत होता. मृत व आरोपीसह चार मित्र शुक्रवारी (दि. 17 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास सोंग्याची वाडी परिसरात असेलल्या एका घरात दारूची पार्टी करत होते. विशेष म्हणजे आरोपी सूरज 2 महिन्यांपूर्वी जेलमधून पॅरोलवर सुटला आहे. अशातच दारूची पार्टी सुरू असतानाच मृत ज्ञानेश्वर याचा हेडफोन घेतला होता. त्यामुळे वाद होऊन दोघांमध्ये भांडण झाले, त्यावेळी मृताचा मोबाईलही आरोपी सूरजने घेतला. हाच वाद आणखी विकोपाला जाऊन ज्ञानेश्वरच्या पायावर व डोक्यात दगडी फरशीने प्रहार केला. याचवेळी ज्ञानेश्वरने आपल्या जवळील चाकूने आरोपी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या चाकूचा वार चुकवून आरोपीने त्याच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्या मांडीत भोसकला. यामुळे गंभीर जखमी अवस्थेत शनिवारी (दि. 18 सप्टेंबर) सकाळपर्यंत घटनास्थळी पडून होता. त्यामुळे त्याचा रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

न्यायालयात करणार हजर

घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात रवाना करून आरोपीचा शोध सुरू केला. चार तासातच आरोपीला म्हारळ गावातून पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दोन गंभीर नोंद असून पॅरोलवर सुटून तो दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. तर आरोपीला रविवारी (दि. 19 सप्टेंबर) न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

उल्हासनगर झोनमध्ये कोविड काळात 32 खून

विशेष म्हणजे गेल्या वर्षापासून म्हणजेच कोरोना काळ सुरू झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे 2020 सालापासून ते सप्टेंबर, 2021 पर्यंत उल्हासनगर झोनमधील उल्हासनगर, बदलापूर , अंबरनाथ शहरात गेल्यावर्षी 20 तर यावर्षी 12 अशा एकूण 32 खूनाच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मोहिते यांनी दिली असून गेल्यावर्षाच्या तुलनेत या वर्षी हत्येचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले. मात्र, कालच सराईत गुंड सुशांत गायकवाडच्या हत्येची बातमी ताजी असताना दुसरी हत्या झाल्याने उल्हासनगरमध्ये हत्येचे सत्र सुरूच असल्याचे दिसून आले.

हेही वाचा - ..तरच स्त्रियांवरील अत्याचाराला आळा बसेल - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.