ETV Bharat / state

BJP MLA Ganpat Gaikwad : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भाजप आमदार रॉकेल ओतून घेणार जाळून; जाणून घ्या काय आहे कारण! - Land Acquisition Money

एमआयडीसीने 50 वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन केले होते. मात्र अद्यापही या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने भाजप आमदार गणपत गायकवाड आक्रमक झाले. मोबदला न मिळाल्यास आपण रॉकेल घेऊन पेटवून घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

BJP MLA Ganpat Gaikwad
भाजप आमदार गणपत गायकवाड
author img

By

Published : Jun 22, 2023, 6:13 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भाजप आमदार रॉकेल ओतून घेणार जाळून

ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील एका भाजपच्या आमदारांचा अंबरनाथ एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्याच्या जमिनीच्या मोबदल्यावरून वाद झाला. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड हे अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले होते. शिवाय जर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर मी स्वतःच अंगावर रॉकेल ओतून जाळून घेणार असल्याचे सांगतानाचा त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. यामुळे सत्ताधाऱ्यांना अधिकारी जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. आमदाराच्या या रॉकेल अंगावर घेऊन जाळून घेण्याच्या धमकीचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

अद्याप मिळाला नाही 50 वर्षापूर्वीचा जमीन भूसंपादनाचा मोबदला : अंबरनाथ - बदलापूर महामार्गावरील वसार गावाजवळील एकेरी मार्ग गेल्या दोन महिन्याभरापासून बंद आहे. तर दुसरा एकेरी मार्ग अरुंद असल्याने या रस्त्यावर दररोज प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मात्र ही वाहतूक कोंडी एमआयडीसी आणि बाधित शेतकऱ्यांमध्ये रस्त्याच्या भूसंपादनाच्या वादातून होत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे गेली 50 वर्षांपासून जमिनीच्या भूसंपादनाच्या मोबदल्यावरून तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी एकेरी मार्ग बंद केला आहे. मात्र रस्ता बंद करूनही एमआयडीसी प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी जमीन कसण्याचा निर्णय घेत चक्क डांबराच्या रस्त्यावर माती टाकून भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली.

मार्ग खुला करण्यासाठी पोलीस बळाचा वापर : दरम्यान बुधवारी बंद केलेला एकेरी मार्ग खुला करण्यासाठी एमआयडीसीचे अधिकाऱ्यांनी पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याच सुमारास घटनास्थळी कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड पोचले. त्यानंतर आमदार गायकवाड यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांना प्रश्न सोडवण्यात स्वारस्य नसून फक्त पैसे हवे असल्याचा आरोप करत सदरचा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याचा त्यांनी यावेळी इशारा दिला.

एमआयडीसीने 50 वर्षांपूर्वी संपादित केली जमीन : अंबरनाथ तालुक्यातील वसार गावातल्या शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसीने सुमारे 50 वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकण्यासाठी संपादित केली होती. मात्र हे भूसंपादन करताना केवळ एका कागदी चुकीमुळे रस्ता आणि पाईपलाईन ज्या जागेतून टाकण्यात आली त्याऐवजी बाजूची जागा एमआयडीसीच्या नावावर झाली आहे. त्यामुळे एकीकडे रस्ता आणि पाईपलाईनची जागाही गेली आणि बाजूची जागाही एमआयडीसीच्या नावावर झाल्यामुळे तिथेही काही करता येत नाही, अशा पेचात इथले शेतकरी अडकले. ही कागदी चूक सुधारण्यासाठी मागील 50 वर्षांपासून लढा देऊनही एमआयडीसी हा प्रश्न सोडवण्यासाठी स्वारस्य दाखवत नाही. त्यातच 21 जून रोजी बुधवारी सकाळी अचानक एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन या ठिकाणी येत हा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत एमआयडीसी अधिकाऱ्यांना विरोध केला. त्यामुळे हा वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.

एक कागदी चूक सुधारण्यासाठी 50 वर्ष : याबाबतची माहिती मिळताच स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनीही या ठिकाणी धाव घेतली. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना केवळ एक कागदी चूक सुधारण्यासाठी मागील 50 वर्षात वेळ मिळालेला नाही. त्यांना फक्त पैसे हवे आहेत, असा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला. तसेच एमआयडीसीचे अधिकारी शेतकऱ्यांना कोर्टात जाण्यासाठी सांगत आहेत. मात्र निजामाच्या जागेची केस मागील 100 वर्षांपासून सुरू आहे. तशीच ही जागा सुद्धा कोर्ट-कचेऱ्यांमध्ये अडकवून ठेवायची आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या सगळ्यानंतर येत्या अधिवेशनातही आपण हा मुद्दा लावून धरणार असल्याचे गणपत गायकवाड यांनी सांगितले आहे.

काय आहे मूळ प्रकरण : डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवरील बारवी धरण पाणी पुरवठा योजनेसाठी एमआयडीसीने शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन केले होते. वसार गावातील शेतकऱ्यांची जमीन देखील यामध्ये भूसंपादित झाली होती. शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्याची आगाऊ रक्कम देखील शासनाकडून देण्यात आली होती. मात्र एमआयडीसीने भूसंपादनासाठी मंजूर केलेली जमीन संपादीत न करता दुसरी जमीन संपादीत केल्याची तक्रार वसार गावातील शेतकरी नरेश वायले यांनी केली आहे. एमआयडीसीने भूसंपादित केलेली जमीन व शेतकऱ्यांची खासगी जमीन दोन्ही भूखंडावर एमआयडीसी आपला हक्क सांगत असून यामुळे शेतकऱ्यांना त्यांची खासगी जमिनीचा काहीही वापर करता येत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. खासगी जागेवर व्यवसाय करण्यासाठी एमआयडीसी अधिकारी निधी मागत असल्याचा आरोप वायले यांनी केला होता.

एमआयडीसी अधिकारी लक्ष देत नाहीत : भूसंपादन झालेली जमीन एमआयडीसीला देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र खासगी जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. या मागणीकडे एमआयडीसी अधिकारी लक्ष देत नाहीत. याविषयी शेतकरी शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहेत. अंबरनाथ येथील उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाने देखील एमआयडीसीला पत्रव्यवहार केला असून एमआयडीसी पाईप लाईन व रस्त्याची वहिवाट यातील भूसंपादन नोंदणी नकाशात तफावत असल्याचे आढळून आल्याचा अहवाल दिला आहे. तशी मोजणी नकाशाची प्रत देखील एमआयडीसी कार्यालयास भूमि अभिलेखा कडून देण्यात आली आहे. वायले यांच्याप्रमाणेच येथील आणखी शेतऱ्यांच्या देखील खासगी जमिनीवर एमआयडीसीने अतिक्रमण केले आहे. एमआयडीसी अधिकारी याकडे गांर्भियाने लक्ष देत नसल्याची तक्रार वसार गावातील शेतकरी करतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.