ठाणे : याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मृत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जखमी पत्नीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनील आहिर असे पत्नीला मारहाण करून आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.
वाद, मारहाण आणि आत्महत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक सुनील हा बदलापूर शहरातील एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी होता. त्याच पक्षातीलच एका पदाधिकाऱ्याचे आपल्या पत्नी बरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय सुनिलला होता. याच कारणावरून सुनील आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होत होते. त्यातच शुक्रवारीही पती-पत्नीमध्ये याच कारणावरून वाद झाला होता; मात्र यावेळी हा वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात सुनीलने लाकडी दांडक्याने पत्नीला मारहाण केली. यावेळी डोक्यात जोरदार प्रहार झाल्याने पत्नी बेशुद्ध पडली होती. परंतु आपली पत्नी मारहाणीत मृत्यू झाली असे समजून सुनिलने घाबरून स्वतः आत्महत्या केली.
पतीचा रेल्वेगाडीखाली आत्महत्येचा प्रयत्न : अशाच एका प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये वाद होत होते. याच तणावातून काही दिवसांपूर्वी पतीने रेल्वेगाडीखाली आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.
त्या पदाधिकाऱ्याचे कृत्य : खळबळजनक बाब म्हणजे, मृतक सुनीलने एका व्हाट्सअप ग्रुपवर त्याची पत्नी आणि संशयित पक्षाचा पदाधिकारी यांची माहिती प्रसिद्ध केली होती. यामुळे पोलीस आता या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला या घटनेकरिता जबाबदार धरणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
विवाहबाह्य संबंध धोकादायकच : अनैतिक संबंधातून आणि संशयातून अनेकदा पती-पत्नीत वाद होतात. काही वेळेस हे वाद इतके विकोपाला जातात की त्याचे रूपांतर हत्येचा घटनांमध्ये होते. काही पती-पत्नीच्या संसारामध्ये अनेकदा असे प्रसंग निर्माण होतात. अशावेळी दोघांनीही सामंज्यस्यातून समस्येवर तोडगा काढणे आवश्यक असते. शक्यतो जोडप्यातील कुठल्याही सदस्याने विवाहबाह्य संबंधांच्या आहारी जाऊ नये. कारण, यामुळे आतापर्यंत अनेक कुटुंबे उद्धस्त झालेली आहेत, याचेच उदाहरण या घटनेवरुन समोर आलेले दिसत आहे.
हेही वाचा: