ETV Bharat / state

पाण्याच्या ओढ्यातुन ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

मागील १२ ते १५ दिवसांपासून ठाण्यात सर्वत्र पाऊस सुरु असल्याने नदी-नाल्यांसह ग्रामीण भागातील ओढ्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मुरबाड तालुक्यातील बंगरवाडी गावातील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना ओढ्यातील कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास करावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

पाण्याच्या ओढ्यातुन ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
author img

By

Published : Jul 13, 2019, 9:49 PM IST

ठाणे - मागली १२ ते १५ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी-नालेसह ग्रामीण भागातील ओढ्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मुरबाड तालुक्यातील बंगरवाडी गावातील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना ओढ्यातील कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास करावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

पाण्याच्या ओढ्यातुन ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

कल्याण-नगर महामार्गावरील मामनोली गावापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या बांगरवाडीतील विद्यार्थ्यांना चौथीच्या पुढील शिक्षणासाठी ३ ते ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंदे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा गाठावी लागते. तर या विद्यार्थ्यांना पावसाळ्यातील २ ते ३ महिने पायपीट करून तसेच पूरसदृश्य ओढ्यातुन शिक्षणासाठी जावे लागते. आपली पुस्तके, वह्या भिजू नये म्हणून हे विद्यार्थी दप्तर आपल्या डोक्यावर घेऊन ओढ्याच्या कंबरेभर पाण्यातून प्रवास करत आहेत.

शाळेत ओले चिंब भिजलेल्या गणवेशात संपूर्ण दिवस त्यांना बसावे लागत आहे. त्यामुळे त्यातील काही विद्यार्थी आजारी पडले आहेत. तर याच परिस्थितीमुळे बांगरवाडीतील तरुणांशी सोयरीकही लवकर कोणी करीत नाही. या गावकऱ्यांनी अनेक वर्षांपासून पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित शासकीय कार्यालयात तसेच या भागातील आमदार , सरपंच, जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे या ओढ्यावर रस्ता बांधून देण्याची मागणी करीत आहेत. मात्र, हा रहदारीचा रस्ता खासगी असल्याने त्यामध्ये शासकीय निधी देऊ शकत नसल्याचे ग्रामस्थांना सांगण्यात येत आहे.

याबाबत स्थानिक प्रशासनाने जागेचा वाद न सोडल्यामुळे या ओढ्यावरच्या रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांनाही या ओढ्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, येत्या दिवसात जोरदार पावसाची शक्‍यता पाहता त्यामध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:पाण्याच्या ओढ्यातुन ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

ठाणे :- गेल्या 12 ते 15 दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी नालेसह ग्रामीण भागातील ओढ्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, अशातच मुरबाड तालुक्यातील बंगरवाडी गावातील ग्रामस्थसह विद्यार्थ्यांना ओढ्यातील कमरे भर पाण्यातून जीवघेणा प्रवास करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे,
कल्याण-नगर महामार्गावरील मामनोली गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बांगरवाडी तील विद्यार्थी चौथीच्या पुढील शिक्षणासाठी 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंदे गावातिल जिल्हा परिषदेच्या शाळा गाठावी लागते, तर या विद्यार्थ्यांना पावसाळ्यातील दोन ते तीन महिने पायपीट करून तसेच पूरसदृश्य ओढ्यातुन शिक्षणासाठी जावे लागत असल्याने आपली पुस्तके, वह्या भिजू नये म्हणून हे विद्यार्थी दप्तर आपल्या डोक्यावर घेऊन ओढ्याच्या कंबरेभर पाण्यातून प्रवास करीत शाळा गाठत आहे, शाळेत ओले चिंब भिजलेल्या गणवेशात संपूर्ण दिवस त्यांना बसावे लागत आहे, यामुळे त्यातील काही विद्यार्थी आजारी पडले आहे, तर याच परिस्थिती मूळे बांगरवाडी तील तरुणांशी सोयरीकही लवकर कोणी करीत नाही, या गावकऱ्यांनी अनेक वर्षांपासून पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित शासकीय कार्यालयात तसेच या भागातील आमदार , सरपंच , जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे या ओढ्यावर रस्ता बांधून देण्याची मागणी करीत आहे , मात्र हा रहदारीचा रस्ता खाजगी असल्याने त्यामध्ये शासकीय निधी देऊ शकत नसल्याचे ग्रामस्थांना सांगण्यात येत आहे,
दरम्यान , याबाबत स्थानिक प्रशासनाने जागेचा वाद न सोडल्यामुळे या ओढ्यावरच्या रस्त्याचे काम रखडल्या चा आरोप गावकऱ्यांनी केला आहे , त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांनाही या ओढ्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो सुदैवाने आतापर्यंत दुर्घटना घडली नाही मात्र येत्या दिवसात ोरदार पावसाची शक्‍यता पाहता त्यामध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.