ETV Bharat / state

भाजपा-शिंदे गटात कमानीच्या नामकरणावरून वाद; भाजपा विरोधात शिंदे गटाचे आमरण उपोषण

Arch Naming Issue: ठाणे जिल्ह्यातील शहापूर नगर पंचायत हद्दीत राज्य सरकारच्या ३० लाखांच्या निधीतून कमान उभारण्यात आली आहे; (Arch naming dispute Shahapur) मात्र स्थानिक भाजपा नगरसेवकानं मनमानी कारभार करीत त्याला स्वतःचं नाव दिलाचा आरोप शिंदे गट (BJP vs Shinde faction) शिवसेनेच्या मागासर्गीय विभागाच्या जिल्हा प्रमुख ज्योती गायकवाड यांनी केला आहे. याविरोधात त्यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. (Shinde faction leader Jyoti Gaikwad)

Arch Naming Issue
उपोषण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 10:28 PM IST

Updated : Nov 16, 2023, 10:39 PM IST

कमानीच्या वादावर शिंदे गट नेत्या गायकवाड आणि नगरसेवक पष्टे यांची प्रतिक्रिया

ठाणे Arch Naming Issue: जिल्ह्यातील शहापूर नगर पंचायत समितीत (शिवसेना) शिंदे गटाची सत्ता आहे. तर राज्यात भाजपा-शिंदे सरकार सत्तेत आहे. (BJP corporator Haresh Pashte) मात्र, ठाणे जिल्ह्यात विविध शहरासह ग्रामीण भागातील दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये अनेकदा राजकीय वादासह श्रेयवादाची लढाई सुरू आहे. शहापूर नगर पंचायत समितीमधील प्रभाग क्र. ७ चे भाजपाचे नगरसेवक हरेश पष्टे आणि शिंदे गट शिवसेनेच्या मागासर्गीय विभागाच्या जिल्हा प्रमुख ज्योती गायकवाड यांच्यामध्ये ३० लाखांचा राज्य सरकराचा निधी खर्च करून उभारलेल्या कमानीच्या नामकरणावरून वाद निर्माण झाला. भाजपाच्या नगरसेवकानं जिल्हा प्रमुखांचे आरोप फेटाळत उपोषणच बेकायदा असल्याचं सांगितलं. यामुळे कमानीच्या नामकरणाचा वाद आणखीच पेटणार असल्याचे दिसून येत आहे.

नामकरणाचा वाद रंगला: विशेष म्हणजे, या कमानीला कोणाचं नाव देण्यात यावं असा ठराव नगसेवकांच्या बैठकीत अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाही; मात्र दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कमानीचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यापूर्वीच या कमानीला दिवंगत भगवान गायकवाड यांचं नाव देण्यासाठी २०२१ साली जिल्हा प्रमुख ज्योती गायकवाडांनी नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी पत्रव्यवहार करून मागणी केल्याचं सांगितलं. तर नगरसेवक पष्टे यांनी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर करून कमान उभारल्याचं सांगितलं.

तर वाद चिघळणार: ज्योती गायकवाडांनी कमानीच्या नामकरणाला विरोध केल्यानं त्यांच्यावर नगरपंचायत प्रशासनाकडून त्यांनी लावलेले फलक काढून टाकल्याचे नगरसेवक पष्टे यांनी सांगितलं. मात्र, ज्योती गायकवाडांनी माझ्यावर कमानीच्या कामावर अडथळा निर्माण केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नगरसेवकानं केला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कमान उभारली असून येत्या नगरपंचायत मधील नगरसेवकांच्या बैठकीत कमानीला नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. नामकरणाचा ठरावच झाला नाही. यामुळे माझ्या विरोधातील उपोषण बेकायदेशीर असल्याचं भाजपा नगरसेवक पष्टे म्हणाले. त्यामुळे भाजपा आणि शिंदे गटाच्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी जर वाद मिटवला नाही तर नामकरणाचा वाद अधिक चिघळणार असल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा:

  1. मातंग समाजाच्या आरक्षणासाठी अर्धनग्न आंदोलन; विविध मागण्यांसाठी पुणे ते नागपूर पदयात्रेला सुरवात
  2. भाजपानं टूर अँड ट्रॅव्हल्स असं नविन खातं उघडलं असावं, राज ठाकरेंचा अमित शाह यांना टोला
  3. मातीवरच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचं पूजन; उद्या स्पर्धांचे औपचारिक उद्‌घाटन

Last Updated : Nov 16, 2023, 10:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.