ETV Bharat / state

बापरे..! मटण कापण्याचा सुरा स्वतःच्या गळ्यावर ठेऊन दुकानदाराचा अतिक्रमण कारवाईला विरोध - उल्हासनगर बातमी

उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीतील मासळी व मटण मार्केटमध्ये अनधिकृत अतिक्रमण काढण्यापूर्वी पालिका प्रशासनाच्या कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा पूर्व कल्पना न दिल्याचा आरोप करत काही दुकानदारांनी मोठा गोंधळ घातला होता.

दुकानदार
दुकानदार
author img

By

Published : Oct 15, 2020, 6:55 PM IST

Updated : Oct 15, 2020, 7:09 PM IST

ठाणे - उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून मासळी व मटण मार्केटमधील अतिक्रमणावर धडक कारवाईला आज (दि. 15 ऑक्टोबर) सुरुवात करण्यात आली होती. मात्र, महापालिकेने कोणतीही नोटीस न देता ही कारवाई सुरू केल्याचा आरोप करत एका मटण विक्रेत्याने मटण कापण्याचा सुराच स्वतःच्या गळ्यावर ठेऊन अतिक्रमण कारवाईला विरोध केल्याने मटण-मासळी बाजारात गोंधळ उडाला होता.

बोलताना सहायक उपायुक्त व दुकानदार

उल्हासनगर कॅम्प नंबर 5 च्या मठमंदिर भागात अतिक्रमण करून मासळी व मटण विक्रीची काही दुकाने थाटण्यात आल्याने रहदारी अडथळा होत असल्याच्या तक्रारी महापालिका अतिक्रमण विभागाकडे आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत आज (गुरुवार) महापालिकेचे अतिक्रमण पथक जेसीबी घेऊन कारवाईसाठी या मासळी व मटण मार्केटमध्ये गेले होते. त्यावेळी एका मटण-मासळी विक्रेत्याने पोलीस आणि पालिका अधिकारी यांच्याशी बाचाबाची होताच धावत जाऊन दुकानातील मटण कापण्याचा सुरा घेतला आणि आपल्या गळ्यावर ठेवला. हा गोंधळ 20 ते 30 मिनिटे सुरू होता. त्यामुळे परिसरात वातावरणात तापले होते.

महापालिकेने आधी नोटीस द्यावी मगच कारवाई करावी, अशी मागणी यावेळी येथील विक्रेत्यांनी करत कारवाईसाठी असलेल्या अधिकाऱ्याची चौकशी मागणीही करण्यात आली आहे. तर ज्या मटण विक्रेत्याने कारवाईत अडथळा आणला त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाणार असल्याची माहिती सहायक उपायुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

हेही वाचा - भाजपा नेत्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये; प्रताप सरनाईकांची राज्यपालांच्या पत्रावर टीका

Last Updated : Oct 15, 2020, 7:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.