ETV Bharat / state

80 Turtles Die Gauripada : पाण्यातील घातक विषाणूमुळे तलावातील ८० हुन अधिक कासवांचा मृत्यू - गौरीपाडा तलावात 80 कासवांचा मृत्यू

गौरीपाडा तलावात २२ जानेवारी रोजी काही कासव मृतावस्थेत आढळली होती. या तलावात लागोपाठ दोन दिवसात तब्बल ८० हुन अधिक कासव मृतावस्थेत आढळल्याने या कासवांच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले होते. प्राणीमित्र संघटना व वन विभागाने तत्काळ धाव घेत मृत कासव तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. मृत कासवांचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. यानंतर कासव कशामुळे दगावले? याची तपासणी करण्यात आली.

मृत पावलेले कासव
मृत पावलेले कासव
author img

By

Published : Mar 3, 2022, 8:29 PM IST

ठाणे - एका तलावात तब्बल ८० हून अधिक कासवांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ही घटना कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा तलावात घडली असून तलावातील दूषित पाण्यात असणारे घातक पदार्थ पोटात गेल्याने या कासवांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. बेरली येथील व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमधून उपलब्ध झालेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कासवांच्या मृत्यूमुळे प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

२२ जानेवारी रोजी घडला प्रकार

कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या गौरीपाडा तलावात २२ जानेवारी रोजी काही कासव मृतावस्थेत आढळली होती. या तलावात लागोपाठ दोन दिवसात तब्बल ८० हुन अधिक कासव मृतावस्थेत आढळल्याने या कासवांच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले होते. प्राणीमित्र संघटना व वन विभागाने तत्काळ धाव घेत मृत कासव तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. मृत कासवांचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. यानंतर कासव कशामुळे दगावले? याची तपासणी करण्यात आली. या व्हिसेरा तपासणीचा अहवाल कल्याण वन विभागाकडे प्राप्त झाला असून या अहवालात कासवांचा मृत्यू घातक विषाणू पोटात गेल्यानेच झाल्याचे निदान नोंदवण्यात आले आहे.

कासवांच्या संवर्धनावर प्रश्नचिन्ह

कासवांच्या मृत्यू प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेशी पत्र व्यवहार करण्यात असल्याची माहिती कल्याण वन विभागाचे अधिकारी चन्ने यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कासवांचा मृत्यू झाल्याने कासवांच्या संवर्धनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर पालिका प्रशासनाने या पाण्यात कोणताही घातक पदार्थ नसल्याचा दावा केला असून अध्यापही पाण्याचे नुमन्याचा अहवाल आला नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे तलावात परिसरातील सांडपाणी सोडले जात असल्याने तलावातील पाणी दूषित होऊन कासवांचा बॅक्टेरियल इन्फेक्शनने मृत्यू झाल्याची शक्यता वॉर या संस्थेचे प्रेम आहेर यांनी वर्तवली आहे. कासवाच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणे आवश्यक असून याबाबत महापालिका प्रशासन आणि कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवदेन देण्यात येणार असल्याचेही वॉर या संस्थेचे आहेर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - पालघर : केळवे येथील समुद्रात पाच जण बुडाले, 4 जणांचा मृत्यू, 1 सुखरूप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.