ETV Bharat / state

अंबरनाथमध्ये कार आणि रिक्षाचा भीषण अपघात, चार जण ठार - अंबरनाथमध्ये रिक्षाला कारची धडक

अंबरनाथमध्ये कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून मृतामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. या घटनेप्रकरणी कारचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात,
कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात,
author img

By

Published : Sep 13, 2021, 6:30 AM IST

Updated : Sep 13, 2021, 6:39 AM IST

ठाणे - कार आणि रिक्षामध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत. अपघाताची ही घटना रविवारी रात्री अंबरनाथ तालुक्यातील पालेगावच्या नवीन एमआयडीसी रस्त्यावर घडली. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. वर्षा वलेचा (वय 51), आरती वलेचा (वय 41) , राज वेलेचा (वय 12) आणि रिक्षाचालक किसन विठ्ठल शिंदे असे भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

अंबरनाथमध्ये कार आणि रिक्षाचा भीषण अपघात

कार चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात..

मिळालेल्या माहितीनुसार भरधाव कार रिक्षावर धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा मधून प्रवास करणाऱ्या उल्हासनगर मधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर रिक्षा चालकही जागीच ठार झाला आहे. या अपघात प्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करून चारही मृत्यूदेह उल्हासनगर मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक करीत आहेत,

Last Updated : Sep 13, 2021, 6:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.