ETV Bharat / state

शहापुरात महावितरणच्या धडक कारवाईत वीज चोरी करताना २१ जण आढळले - ठाणे शहापूर महावितरण धडक कारवाई

घरात इन्कमिंग वायरला जॉईंट असणे, मीटर बायपास, मीटरचे एमसील तोडणे हे वीज चोरीचे प्रकार असून वीजचोरी करणाऱ्या व्यक्तीस वीज कायदा-२००३ चे कलम १३५ व १२६ नुसार तीन वर्षांपर्यंतचा कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद असून वीज ग्राहकांनी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

ठाणे शहापूर महावितरण धडक कारवाई
ठाणे शहापूर महावितरण धडक कारवाई
author img

By

Published : Feb 4, 2021, 7:54 PM IST

ठाणे - शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वाखाली शहापुर तालुक्यातील शेरे, मसवने, अंब्रजे, शेयी, वाशिंद येथील एकूण २२८ घरे तपासली असता त्यातील २१ ठिकाणी अनधिकृत वीजपुरवठा सुरू असल्याचे आढळले आहे. महावितरणच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान सरासरी ४८ हजार युनिटची वीजचोरी पकडण्यात आली आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात तालुक्यातील खर्डी, कसारा, वाशिंद, धसई, किन्हवली, सोगाव, चेरपोली, अल्याणी, गुंडे, खराडे, आसनगाव, साने, सापगाव व अनेक गावात सदर पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून यात मासवणे ग्रामपंचायत यांचे स्ट्रीट लाईट व अंबर्जे येथील पाणी पुरवठ्यासाठी असलेले कनेक्शन डायरेक्ट असल्याचे आढळले. या नंतर देखील अशा मोहिमा चालू राहणार असल्याचे महावितरणकडून जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा - कल्याणच्या इराणी वस्तीत झालेल्या जमावाच्या हल्ल्यात तीन पोलीस जखमी

वीज चोरी प्रकरणी गुन्हे दाखल

शहापूर तालुक्यातील कळंभे, सावरोली येथे पकडण्यात आलेल्या वीज चोरीच्या कारवाईत नाकुबई बबन दळवी, बाळू काळू वाघ, केशव गणपत धळपे, ज्योत्स्ना बळी ढळपे, नितीन मधुकर वाघ्रे, सोपान चंद्रकांत घरत, सुरेखा संतोष बोंद्रे, मंगल चहू हिरवे, बाळकृष्ण पडू चौधरी, जैतू भुधा खडके, जिंजा तुकाराम वेखंडे, शांती मधुकर घरत, बाळू नामदेव भेरे, भगवान बळी बोंद्रे, काशिनाथ राघो पोकला, शंकर धर्मा मोरे, किरण रघुनाथ सातपुते, कमलाकर हरी वाघरे अशी वीज चोरी प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्याची नावे आहेत.

तीन वर्षांपर्यंतचा कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद

घरात इन्कमिंग वायरला जॉईंट असणे, मीटर बायपास, मीटरचे एमसील तोडणे हे वीज चोरीचे प्रकार असून वीजचोरी करणाऱ्या व्यक्तीस वीज कायदा-२००३ चे कलम १३५ व १२६ नुसार तीन वर्षांपर्यंतचा कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद असून वीज ग्राहकांनी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. आजच्या वीज चोरीच्या मोहिमेत शहापूर उपविभागातील सहायक अभियंता अविनाश शिरसागर, सहाय्यक लेखापाल विशाल सानप, सहाय्यक अभियता चेतन वाघ, सहाय्यक अभियंता विश्वजित खैतापुरकर, कनिष्ठ अभियंता त्रंबक कदम, सहाय्यक अभियता सूरज अंबूर्ले, सहाय्यक अभियता अमोल भिरे, तसेच २० कर्मचारी व ३ सुरक्षा रक्षक यांच्या वतीने कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा - जन्मजात अंधत्व असणाऱ्या राहुलला परदेशी शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.