पंढरपूर (सोलापूर) - मोदी सरकारला कृषी कायदे रद्द करण्याची सुबुद्धी द्यावी, असे साकडे विठ्ठल-रुक्मिणी मातेला घातल्याची संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे यांनी सांगितले.
कृषी कायद्याविरोधात पोल-खोल यात्रा
दोन महिन्यापूर्वी केंद्र शासनाकडून शेतकरी विरोधात कृषी कायदा संमत झाला. त्या कृषी कायद्यातील पोल-खोल करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने 'पोल-खोल यात्रा' काढण्यात येत आहे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. त्याचे पोल-खोल करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
विठ्ठल-रुक्मिणी साकडे
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या केंद्रबिंदू ठरलेल्या फुलतांबा या गावातून या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. ही किसान यात्रा मंगळवारी पंढरपूर येथे दाखल झाली. यात्रेतील पदाधिकाऱ्यांनी नामदेव पायरीचे दर्शन घेऊन विठ्ठल रुक्मिणी मातेचे प्रदक्षिणा मारली. पंढरपुरातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी या किसान यात्रेचे जोरदार स्वागत केले. किसान यात्रेतील पदाधिकाऱ्यांकडून विठ्ठलाला यावेळी साकडे घालण्यात आले.
किसान यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कृषी कायदा शेतकऱ्यांविरुद्ध आहे. याची माहिती आम्ही राज्यातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन शेतकर्यांना देणार आहोत. या कायद्याविरोधात केंद्र सरकार किंवा शेतकरी उच्च न्यायालयात गेला नाही. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अदखलपात्र असणार आहे. केंद्र सरकार जोपर्यंत हा कायदा रद्द करत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा पुनरुच्चार गिड्डे यांनी यावेळी केला.
हेही वाचा - सोलापुरात हुतात्म्यांच्या पुतळ्यांची दुरावस्था; संभाजी आरमारचा महापालिकेत ठिय्या
हेही वाचा - अपघात करुन पळ काढणाऱ्या चारचाकीस पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले