ETV Bharat / state

सोलापूरच्या महापौरपदाचा मुकूट कुणाच्या शिरावर; भाजप व महाविकास आघाडीत चुरस - महाराष्ट्र विकास आघाडी

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे नवीन समीकरण तयार झाले आहे. याच पडसाद स्थानिक स्वराज संस्थेत कसे पडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सोलापूर महापालिकेत महापौरपदाची निवडणूक आहे. इथे भाजप आपला गड राखते की महाविकास आघाडी सत्ता काबीज करते ते आज ठरेल.

solapur
सोलापूर महापालिका
author img

By

Published : Dec 4, 2019, 10:32 AM IST

सोलापूर - महानगरपालिकेच्या महापौराची आज निवडणूक आहे. पालिकेच्या यशवंतराव सभागृहात ही निवड होणार असून, पालिका प्रशासनाकडून याची तयारी करण्यात येणार आहे. राज्यात अस्तित्वात आलेल्या नव्या महाराष्ट्र विकास आघाडीमुळे ही निवडणूक महत्वाची आहे. सध्ये येथे भाजपचा महापौर आहे. भाजप जागा कायम राखतो की महाआघाडीचा महापौर जिंकतो हे आज ठरेल.

सोलापूर महापालिका

पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता ३८ व्या महापौरपदाची निवड प्रक्रिया पालिका प्रशासनाकडून पूर्ण केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी प्रवीण वायचळ हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. यावेळी पालिकेच्या सभागृहात उपस्थित असलेल्या नगरसेवकांचे हात उंचावून मतदान घेतले जाणार आहे. भाजपाकडून श्रीकांचन यन्नम आणि महाविकास आघाडीकडून सारिका पिसे यांच्यात थेट लढत होत आहे.

हेही वाचा - अपंगत्वावरही 'विजय', पीएच. डी. प्रवेश परीक्षेत पात्र; अपंग असल्याने गाईडने नाकारले

तब्बल ३० वर्षे काँग्रेसचा महापौर
सोलापूर महानगरपालिकेत ३७ मान्यवरांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला. महापालिकेच्या राजकारणात मागील तीस वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता असल्याने ३४ महापौर काँग्रेसचेच झाले. किशोर देशपांडे हे पुलोद आघाडीकडून निवडून आलेले पहिले काँग्रेसेतर महापौर होते. हा एक अपवाद वगळता महापालिकेत काँग्रेस पक्षाचेच महापौर झाले. २०१७ च्या पालिका निवडणुकीनंतर पालिकेच्या राजकारणात भाजपाने आपल्या बहुमताच्या जोरावर २१ वर्षानंतर शोभा बनशेट्टी यांना गैरकाँग्रेसी महापौर होण्याचा संधी मिळवून दिला.

हेही वाचा - नाणार प्रकल्प विदर्भात आणावा आशिष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हे आहेत आतापर्यंतचे महापौर
सोलापूरला महानगरपालिकेचा दर्जा मिळताच प्रथम महापौर म्हणून पारसमल जोशी यांना महापौरपदाचा मान मिळाला. त्यानंतर अनुक्रमे तात्यासाहेब घोंगडे, इरय्या बोल्ली, विश्वनाथ बनशेट्टी, राजाराम बुर्गुल, बाबुराव चाकोते, भीमराव जाधव, युनूसभाई शेख, भालचंद्र अलकुंटे, विश्वनाथ भोगडे, सिद्राम आडम, भगवान चव्हाण, नारायण राठी, पूर्णचंद्र पुंजाल, किशोर देशपांडे , बंडप्पा मुनाळे, महादेव महिंद्रकर, धर्मांण्णा सादुल, मुरलीधर पात्रे, उमरखान बेरिया, विश्वनाथ चाकोते, मनोहर सपाटे, महेश कोठे, सुभाष पाटणकर, खाजादाऊद नालबंद, शेवंताबाई पवार, जनार्दन कारमपुरी, संजय हेमगड्डी, नलिनी चंदेले, विठ्ठल जाधव , अरुणा वाकसे, अरिफ शेख , अलका राठोड, सुशीला आबुटे, शोभा बनशेट्टी यांनी महापौर म्हणून काम पाहिले.

Intro:mh_sol_01_mahapour_niwad_7201168

सोलापूर महापौर पदासाठी आज निवड,
भाजप की महा विकास आघाडीचा महापौर होणार याकडे लक्ष

सोलापूर-

सोलापूर महानगरपालिकेच्या 38 व्या महापौर पदाची निवड आज बुधवारी पालिकेच्या यशवंतराव सभागृहात होणार असून महापौर पदाच्या निवडीची संपूर्ण तयारी पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.Body:राज्याच्या विधिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिनियमाचा कायदा लागू केला आणि सोलापूरातील नगरपालिका 1964 रोजी महानगरपालिका झाली सोलापूराला महापालिकेचा दर्जा मिळाला ...त्यानंतर शहरात सोलापूर महानगरपालिकेच्या मार्फत शहराच्या विकासाला चालना मिळाली सोलापूर महानगरपालिकेच्या कारभारात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या महापौर पदाची देखील शृंखला ही महत्त्वाची मानली जाते.

सोलापूर महानगरपालिकेचा दर्जा मिळतात प्रथम महापौर म्हणून पारसमल जोशी यांना तो मान मिळाला त्यानंतर अनुक्रमे तात्यासाहेब घोंगडे नरसय्या बोल्ली विश्वनाथ बनशेट्टी राजाराम बुर्गुल बाबुराव चाकोते भीमराव जाधव युनूसभाई शेख भालचंद्र अलकुंटे विश्वनाथ भोगडे सिद्राम आडम भगवान चव्हाण नारायण राठी पूर्णचंद्र
पुंजाल किशोर देशपांडे बंडप्पा मुनाळे महादेव महिंद्रकर धर्मांण्णा सादुल मुरलीधर पात्रे उमरखान बेरिया विश्वनाथ चाकोते मनोहर सपाटे महेश कोठे सुभाष पाटणकर खाजादाऊद नालबंद शेवंताबाई पवार जनार्दन कारमपुरी संजय हेमगड्डी नलिनी चंदेले विठ्ठल जाधव अरुणा वाकसे अरिफ शेख अलका राठोड सुशीला आबुटे शोभा बनशेट्टी यांनी महापौर म्हणून काम पाहिले.

सोलापूर महानगरपालिकेत 37 मान्यवरांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला महापालिकेच्या राजकारणात मागील तीस वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता असल्याने 34 काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना महापौरपदाचा सन्मान मिळाला किशोर देशपांडे हे पुलोद आघाडीकडून महापौर पदावर विराजमान झाले होते. हा एक अपवाद वगळता महापालिकेत काँग्रेस पक्षाचाच महापौर झाले. 2017च्या पालिका निवडणुकी नंतर पालिकेच्या राजकारणात भाजपाने आपल्या बहुमताच्या जोरावर 21 वर्षानंतर शोभाताई बनशेट्टी यांना गैर काँग्रेसी महापौर होण्याचा संधी मिळवून दिला..

बुधवारी पालिकेच्या यशवंतराव सभागृहात सकाळी अकरा वाजता 38 व्या महापौरपदाची निवड प्रक्रिया पालिका प्रशासनाकडून पूर्ण केली जाणार आहे... ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी प्रवीण वायचळ हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत यावेळी पालिकेच्या सभागृहात उपस्थित असलेल्या नगरसेवकांना ना हात उंचावून मतदान घेतले जाणार आहे 38 व्या महापौरपदाच्या निवडीकरिता भाजपाकडून श्रीकांचन यन्नम आणि महाविकास आघाडीकडून सारिका पिसे ह्या समोरासमोर उभ्या आहेत .यापैकी निवडून येणाऱ्या महिला नगरसेविकेला सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहास 38 सहाव्या महापौर म्हणून विराजमान होण्याची संधी मिळणार आहे.त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहराचे लक्ष बुधवारी होणा-या महापौर पदाच्या निवडीकडे लागून राहिला...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.