सोलापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. 27 ऑक्टोबर) दुपारी सोलापुरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. यावेळी टाळेबंदीमधील सर्व वीजबिल माफ झाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
सोलापूर येथील जुनी मिल कंपाऊंड परिसरात महावितरणचे मुख्य कार्यालय आहे. मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. मुख्य कार्यालयाच्या फाटकाला घोषणा देत टाळे ठोकले. उपस्थित असलेल्या पोलिसानी आंदोलकांना फाटकाच्या बाहेर आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या.
फाटकाला टाळे ठोकून आंदोलकांनी फाटकासमोरच ठिय्या केला. टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. टाळेबंदीमध्ये हाताला काहीही काम धंदा नव्हता. मग या तीन महिन्यांचे वीजबिल सरकारने माफ करावे. केंद्र सरकार व राज्य सरकार उद्योजकांना वेगवेगळे पद्धतीने आर्थिक मदत करत आहेत. पण, शेतकऱ्यांना का मदत मिळत नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले.
हेही वाचा - खासगी सावकाराच्या छळास कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचे 'शोले स्टाईल' आंदोलन