सोलापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव संपूर्ण कॅबिनेटसह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. त्यामुळे यंदाच्या आषाढीला राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. के. चंद्रशेखर राव यांचे सोलापुरात स्वागत आहे. केसीआर यांना शीक कबाब खाऊ घालू, असे पक्ष देशावर राज्य करू शकत नाही असे ते म्हणाले. सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी धर्मराज काडादी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
केसीआर यांना शीक कबाब खाऊ घालू : केसीआर आपल्या सर्व मंत्रिमंडळासह पंढरपूरला येणार आहेत. याबाबत सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मी देशाचा गृहमंत्री असतानाच आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्य माझ्या सहीने निर्माण झाले. त्यांची काय स्थिती होती हेसुद्धा मला माहीत आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांची काही ताकद नाही असे लोक सुध्दा येतात, परंतु ते देशावर कधीच राज्य करू शकत नाहीत. ते सोलापुरात येऊ द्या आपण त्यांचे स्वागत करू, त्यांना सोलापूरची प्रसिद्ध शीख कढई फार आवडेल अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
चिमणी असताना अनेक विमान उतरली : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्याने, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. चिमणी असताना अनेक विमान आली होती, तरी देखील चिमणी पाडली अशी खंत, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केली.
प्रणिती शिंदेंचे भाजपला चॅलेंज : भाजपच्या लोकांनी वैयक्तिक दुश्मनी आणि राजकीय द्वेषातून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडली. आता बघूयात किती दिवसात तुम्ही तुमची विमानसेवा सुरू करताय. बघूयात बोरामणी विमानतळासाठी निधी आणून विमानसेवा सुरू करतायत. मी लिहून देते की, त्यांना हे जमणार नाही, अशा शब्दांत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. सोलापुरातील चिमणी समर्थक हे फक्त भाजपविरोधात प्रतिक्रिया देत आहेत. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला भेट देत, विमानसेवा सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यातील सत्ताधारी व ५० खोकेवाले आणि भाजप सरकार हेच जबाबदार आहे. आम्ही काडादी तसेच सभासद शेतकरी, कामगारांना मदत करण्यासाठी तयार आहोत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -