ETV Bharat / state

माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी, आरोग्य सेवेचा आढावा - सुभाष देशमुखांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर तालूक्यातील आरोग्य सेवेचा घेतला आढावा घेतला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव, भंडारकवठे, आनंदनगर येथील आरोग्य केंद्रांना सुभाष देशमुख यांनी भेटी दिल्या.

subhash deshmuk
सुभाष देशमुखांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी
author img

By

Published : Apr 1, 2020, 10:40 PM IST

सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर तालूक्यातील आरोग्य सेवेचा घेतला आढावा घेतला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव, भंडारकवठे, आनंदनगर येथील आरोग्य केंद्रांना सुभाष देशमुख यांनी भेटी दिल्या. देशमुख यांनी कोरोना संदर्भात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कराव्या लागणार्‍या उपाययोजनांचा आढावा घेतला. यासाठी लागणारे मनुष्यबळ असो वा आर्थिक मदत आपण सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

subhash deshmuk
सुभाष देशमुखांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी

आमदार सुभाष देशमुख यांनी कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नुकतेच त्यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंच आणि भाजप पदाधिकार्‍यांबरोबर दूरध्वनीबाबत संवाद साधत गावातील समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी त्यांनी दक्षिण तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांना भेट घेऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली. कोणतीही अडचण आल्यास लगेच संपर्क साधावा, आपण सर्व मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देशमुख यांनी सुरक्षा धोक्यात घालून जनसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असणार्‍या डॉक्टर, परिचारक, वार्डबॉय, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालक तसेच सुरक्षारक्षक व पोलिसांचे कौतूक करत स्वतःची योग्य काळजी घेण्याचे आवाहनही केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.