सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि शहर प्रशासन वेगवेगळे आणि कडक उपाययोजना करत आहेत. सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील दुकानांना फक्त सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरू ठेवण्याचा आदेश पारित केला आहे. मेडिकल आणि रुग्णालयांना यामधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शहरात शुकशुकाट पहायला मिळत आहे.
कडक लॉकडाऊनकडे वाटचाल
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दररोज एक हजार ते चौदाशे कोरोना रुग्ण आढळत आहेत. 25 ते 35 वयागटातील रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू होत आहे. ही रुग्णवाढ किंवा मृत्यू दर कमी करण्यासाठी सोलापूर आता कडक लॉकडाऊनकडे वाटचाल करत आहे.
सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवता येतील. यामध्ये किराणा, भाजी पाला, दूध डेअरी, फळ विक्रेते, बेकरी ,चिकन, अंडी विक्रीची दुकाने,पाळीव प्राण्यांची खाद्य विक्रीची दुकाने आदी आहेत. पण यावेळेत सर्वच ग्राहक खरेदीसाठी बाहेर येत आहेत. दुकानांत झुंबड करत आहेत. या गर्दीवर वेळेत नियंत्रण आले नाही तर कोरोना विषाणूचा कहर सुरूच राहणार अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा-कोरोना वॉर्डात मोठ्याने बोलू नका म्हणणाऱ्या डॉक्टरावर नातेवाईकाचा हल्ला