माढा (सोलापूर)- दुकान गाळे विकण्याच्या कारणावरुन जन्मदात्या बापाचा मुलाने गळा व तोंड दाबून खून केल्याची समोर आली आहे. ही घटना अंजनगाव(उमाटे)गावात शुक्रवारी (३१ जुलै) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली.
रमेश विठ्ठल माळी (वय ५०)अस मृत वडिलांचे नाव आहे. मुलगा गणेश रमेश माळी (वय २३ ) याच्यावर माढा पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला. रमेश माळी यांची पत्नी अंजना माळी यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
बाप-लेकामध्ये गाळे विकण्याच्या कारणावरुन भांडण झाले. वडिलांनी गाळे विकणारच असे म्हणाल्याच्या कारणावरुन चिडून मुलगा गणेश ने रमेश यांच्या मानेवर बुक्कीने मारहाण केली.यामुळे रमेश हे खाली पडल्यानंतर गणेशने वडिलांचा गळा व नाक तोंड दाबून त्यांचा जीव घेतला,असे अंजना माळी यांनी सांगितले. माढा ग्रामीण रुग्णालयात रमेश यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,दोन विवाहित मुली असा परिवार आहे.