ETV Bharat / state

सासू सासऱ्याकडून जावयास मारहाण; सोलापूरातील घटना - son in law beaten at solapur

सासू-सासऱ्याकडून जावयास मारहाण करण्यात आल्याची घटना फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यामध्ये सागर मोरे जखमी झाले असून त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी तपास पोलीस नाईक चव्हाण करत आहेत.

सोलापूर
सोलापूर
author img

By

Published : Jul 3, 2020, 6:31 AM IST

सोलापूर - सासू-सासऱ्याकडून जावयास मारहाण करण्यात आल्याची घटना फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. उमा नगरी येथील रहिवासी सागर बाळू मोरे (वय 21) यांनी तक्रार नोंदवली आहे. सविता नागनाथ वाघमारे, नागनाथ वाघमारे, आंबूबाई वाघमारे अशी आरोपींची नावे आहेत.

सागर मोरे हे आपल्या पत्नीस बोलावण्याकरीता सासू-सासरे यांच्या घरी गेले होते. मात्र, पत्नीने आई वडील घरात नाहीत, लग्नासाठी बाहेर गेले आहेत, अशी माहिती दिली. तर दुसरीकडे आई वडिलांना फोन करून सागर मोरे आल्याची माहिती दिली. त्यावर जोपर्यंत तुम्ही वेगळे राहत नाही. तो पर्यंत आम्ही आमच्या मुलीला नांदवण्यास पाठविणार नाही, असे मुलीच्या आई-वडिलांनी फोनवरून स्पष्टपणे सांगितले. त्यावर सागर मोरे तेथून निघून गेले.

29 जूनला सायंकाळी संशयित आरोपी सविता वाघमारे, नागनाथ वाघमारे आंबूबाई वाघमारे हे सागर मोरे यांच्या घरी आले व आमच्या मुलीला घेण्यासाठी आमच्या घरी का आला, असे विचार जावयाच्या आई-वडिलांस मारहाण करू लागले. त्यावेळी सागर यांनी सासू सासऱ्यास विरोध केला असता, त्यांनी फरशीच्या तुकड्याने सागर यांच्या डोक्यावर वार केला. यामध्ये सागर मोरे जखमी झाले असून त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी तपास पोलीस नाईक चव्हाण करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.